Marathi remake of Malayalam film 'Angmali Diaries' soon, announced by Avadhut Gupte | मल्याळम चित्रपट 'अंगमाली डायरीज'चा मराठी रिमेक लवकरच, अवधुत गुप्तेने केली घोषणा
मल्याळम चित्रपट 'अंगमाली डायरीज'चा मराठी रिमेक लवकरच, अवधुत गुप्तेने केली घोषणा

ठळक मुद्दे 'अंगमाली डायरीज' या मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज'

गेल्या वर्षी प्रदर्शित अंगमाली डायरीज हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला साऊथमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने वीस कोटींहून अधिक गल्ला जमविला होता. आता या चित्रपटाचा मराठीत रिमेक येत असून या चित्रपटाचे नाव 'कोल्हापूर डायरीज' असे आहे. या चित्रपटाची घोषणा गायक अवधूत गुप्तेने सोशल मीडियावर दिली आहे. तसेच चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबतची काही माहिती ट्विटरवर दिली आहे.


तरण आदर्श यांनी ट्विट केले की, अवधूत गुप्ते व वजीर सिंग 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन जो राजन करत आहेत. हा अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या यशस्वी मल्याळम चित्रपट 'अंगमाली डायरीज'चा रिमेक आहे. कोल्हापूर डायरीज चित्रपटाची टीम अखेरचे कोल्हापूरमधील चित्रीकरण करीत आहेत. 
अवधूत गुप्तेने तरण आदर्श यांचे ट्विट सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की, जय कोल्हापूर! मित्रांनो... यंदाच्या वर्षी एका धमाक्यासाठी तयार रहा. 
अंगमाली डायरीज चित्रपट क्राईम ड्रामावर आधारीत आहे. यात अंगमाली या ठिकाणी राहणाऱ्या विन्सेन्ट पेपे या युवकाची कथा रेखाटण्यात आली आहे. तो एका घटनेमुळे गुन्हेगारी जगात सामील होतो आणि मग, त्याला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, हे यात दाखवण्यात आले आहे. 
अंगमाली डायरीज या चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज' चित्रपटाची कथा ही कोल्हापूरमध्ये घडलेली दाखवण्यात आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटात कोण कोण कलाकार आणि कथा काय असणार हे जाणून घेणे औत्सुकतेचे ठरणार आहे.


Web Title: Marathi remake of Malayalam film 'Angmali Diaries' soon, announced by Avadhut Gupte
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.