The Marathi Industry's Pool - Pune - Siddharth Chandekar | मराठी इंडस्ट्रीचा बालेकिल्ला पुणेच - सिद्धार्थ चांदेकर


         क्लासमेट्स, झेंडा, बालगंधर्व, आॅनलाईन-बिनलाईन सतरंगी रे, दुसरी गोष्ट असे चित्रपट तर अग्निहोत्र सारख्या मालिकेमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसमोर स्वत:च्या अभिनयाची छाप सोडणारा सिद्धार्थ चांदेकर आज घराघरात पोहचला आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील त्याच्या करिअरचा चढता आलेख पाहता येणाºया काही कालावधीत आपल्याला सिद्धार्थच्या दर्जेदार भुमिका मोठ्या पडद्यावर पहायला मिळतील यात शंका नाही. नूकतेच त्याच्या बसस्टॉप या चित्रपटाचे शुटिंग संपले आहे. बसस्टॉपच्या सेटवर सीएनएक्सने सिद्धार्थ सोबत सेलिब्रिटी रिपोर्टरच्या माध्यामातून साधलेला हा मनमोकळा संवाद.
          मराठी सिनेमाला आज खुप मोठा आॅडियन्स मिळत आहे ही खरच आपल्यासलाठी गौरवाची बाब आहे. आपल्या कुटूंबासहित चित्रपट पाहणारे अनेक लोक आहेत त्याचे कारण म्हणजे आजच्या मराठी सिनेमाचा बदलता विषय. पुणे-मुंबईमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यावर विकेंडमध्येच त्याचे जबरदस्त कलेक्शन होते. खरे पहायला गेले तर पुण्यात मराठी सिनेमाचा प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आहे. आज पुण्यातून मराठी सिनेमाचे जवळपास ६० टक्के कलेक्शन होते ही खरच मोठी गोष्ट आहे. पुण्यात मराठी सिनेमाचा रसिकवर्ग असल्याने तिथे एवढी चांगली कमाई होते. हळूहळू औरंगाबाद, नाशिक, नागपुर या ठीकाणी देखील मराठी सिनेमाचे कलेक्शन होत आहे.

                                    
          मराठी चित्रपटांमध्ये पुर्वीपासुनच वेगवेगळे विषय अतिशय चांगल्या प्रकारे पडद्यावर मांडले गेले आहेत. आपल्याकडे कन्टेन्टची कधीच कमतरता नव्हती. मराठी चित्रपटाचा आशय हा नेहमीच दर्जेदार होता. परंतू आपण फक्त टेक्निकला जास्त महत्व देत नव्हतो. तांत्रिक दृष्ट्या चित्रपट उठावदार करायचा म्हणजे त्याला खर्च येणार आणि आपण चित्रपटावर टेक्निकल खर्च करायला तयार नसायचो. आता हे चित्र बदलत असुन प्रोड्युसर नफ्या तोट्याच्या पुढे विचार करीत आहेत.  चित्रपट उत्तम होण्यासाठी टेक्निकवर खर्च करण्याची त्यांची तयारी असते. बॉलीवुडप्रमाणे आपल्याकडेही आता कपडे, मोठ मोठे सेट्स, सुंदर लोकेशन्स, कॅमेरा, म्युझिक या गोष्टींवर पैसा खर्च केला जातोय. 
          सर्वसामान्य माणुस जेव्हा त्याच्या फॅमिलिसोबत थिएटरमध्ये सिनेमा पहायला जातो तेव्हा २०० ते २५० रुपयाचे तिकिट तो काढतो. एक चित्रपट पाहण्यासाठी १२००-१३०० रुपये जर सर्वसामान्य  प्रेक्षक घालवत असेल तर आपले देखील कर्तव्य आहे त्यांना दर्जेदार काहीतरी द्यायला पाहिजे. नटसम्राट, क्सासमेट्स, लयभारी या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर पैसा कमविलाच पण प्रेक्षकांची मने देखील जिंकली आहेत. 
           ग्रामीण भागात चित्रपट पोहचत नाहीत कारण तिथल्या थिएटर्सची कमतरता आणि आहेत त्या थिएटर्सची अस्वच्छता. त्यामुळे गावांमध्ये जे नाटकांचे स्टेज असतात तिथे चित्रपट दाखविले जायला पाहिजे. गावातील स्त्रीयांसाठी खास एक शो अरेंज करायला हवा. थिएटर्समध्ये चांगल्या स्वच्छतागृहांची सोय असायला पाहिजे. सरकारलाच प्रत्येक गोष्टीसाठी दोष देण्यापेक्षा आपणच एकत्र येऊन काहीतरी केले पाहीजे. नाटक, सिनेमा जर ग्रामीण भागात पोहचला थिएटर्स निर्माण झाले तर एंटरटेन्मेंट इंटस्ट्रीमुळे गावातील लोकांना रोजगार देखील उपलब्ध होऊ शकतो. केवळ आॅडियन्स अन थिएटर्सच्या कमतरतेमुळे काही ग्रामीण भागात चित्रपटांचे प्रमोशन केले जात नाहीत. परंतू अशाप्रकारच्या सुधारणा झाल्या तर नक्कीच गावांमध्येदेखील प्रमोशन्स करायला मजा येईल. या गोष्टींकडे लक्ष दिले तर नक्कीच सिनेमा ग्रामीण प्रेक्षकदेखील पाहतील. 

                        
        

         मला कोणत्या प्रकारची, कशी भुमिका करायची याचा विचार मी कधीच करीत नाही. कारण आपण विचार केलेला रोल आपल्याला मिळेल असे नाही. मी एक वेळ भुमिकेचा अभ्यास करु शकतो परंतू ठरवून कोणता रोल करु शकत नाही. मला त्या क्षणाला जी भुमिका चांगली वाटेल, त्या भुमिकेत मला मी दिसलो कि मी लगेच तो रोल स्वीकारतो. त्यामुळे माझा कोणताही ड्रीम रोल नाही. मला चांगल्या दर्जेदार भुमिकाच नेहमी करायला आवडतात.
           हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वजण अगदी प्रोफेशनली काम करतात. आपणही कामामध्ये त्यांच्यासारखी प्रोफेशनॅलिटी शिकायला हवी. कोणी कोणाचे कितीही जवळचे फ्रेन्ड्स असले तरी चित्रपटामध्ये जर हे लोक एकत्र आले तर सेटवर कोणीच कोणाचे नसते. प्रत्येकजण आपले काम किती अन कसे चांगले होते तेच पाहत असतो. आपण आपल्या शॉट पेक्षा मित्राचा शॉट कसा झाला आहे. कोणाचा सीन किती चांगला झालाय हेच पाहत असतो. परंतू इथे खरतच आपण स्वत:च्या कामाशी काम ठेवून स्वार्थी असणचे गरजेचे आहे. 
Web Title: The Marathi Industry's Pool - Pune - Siddharth Chandekar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.