Marathi film will be successful if viewers join together. | ​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा !

-रवींद्र मोरे 
मराठी चित्रपटातही आता नवीन विषय हाताळायला सुरुवात झाली आहे, मात्र दर्शक अजूनही हिंदी चित्रपटांकडेच वळतात. पण दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपटदेखील यशस्वी होऊ शकतात, असे मत कश्मिरा शहा यांनी व्यक्त केले. नुकताच रिलीज झालेल्या 'शिकारी' या मराठी चित्रपटातील तिची भूमिका उल्लेखनिय आहे. एकंदरीत या चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी तिच्याशी सीएनएक्सने मारलेल्या मनसोक्त गप्पा...

* चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी काय सांगाल?
- माझे आडनाव शहा असल्याने बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटते की, मी एवढी चांगली मराठी बोलू शकेल शिवाय या मराठी चित्रपटात काम करु शकले म्हणून मी देखील शॉकमध्ये आहे. या चित्रपटाअगोदर तसे मी दोन मराठी चित्रपटात काम केले आहे, मात्र या चित्रपटाचा अनुभव वेगळाच वाटला. यात मी एका १७ वर्षीय मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे. आणि दिग्दर्शकांच्या मार्गदर्शकाने मी ती भूमिका उत्तम साकारु शकली. 

* कास्टिंग काउच या विषयावर अगोदरही काही चित्रपट बनले आहेत, तर या चित्रपटाचे वेगळेपण काय आहे?
- मुंबईत सिनेसृष्टीत काम करण्यासाठी रोज शेकडो लोक येतात, त्यापैकी अगदी नगण्य लोकांनाच संधी मिळते, मात्र काहींसोबत दुर्व्यवहार केला जातो, त्यालाच सिनेसृष्टीत कास्टिंग काउच म्हणतात, तसे इतर क्षेत्रातही अशा प्रकारचा दुर्व्यवहार होत असतो. मात्र सिनेसृष्टी या नावाने बदनाम झाली आहे. या चित्रपटात नेमक्या याच विषयावर फोकस करण्यात आला आहे. तसा हा चित्रपट एन्टरटेनमेंटवर आधारित असून डबल मिनिंग संवादही आहेत. शिवाय या चित्रपटातून सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.

* चित्रपटाला यश मिळावे म्हणून बोल्ड सीनचा भडिमार केला जातो का? याबाबत काय सांगाल?
-  माझ्या मते नाही, कारण तसे राहिले असते तर सर्वच बोल्ड चित्रपट सुपरहिट झाले असते. या चित्रपटाच्या स्क्रीप्ट नुसारच ते सीन देण्यात आले आहेत. चित्रपटातील त्या मुलीला अभिनय करण्याची खूपच इच्छा असते, म्हणून ती मुंबईला जाते. त्याठिकाणी अभिनेत्री बनण्यासाठी करावा लागणारा संघर्ष दाखविण्यात आला आहे, मान्य आहे की चित्रपटात बोल्ड सीन आहेत, मात्र ती चित्रपटाची गरज होती. 

* मराठी चित्रपटांच्या यशासाठी अजून काय प्रयत्न केले पाहिजेत?
- आता मराठी चित्रपटातही वेगळ्या धाटणीचे विषय हाताळले जात आहेत, मात्र दर्शकांची मोठी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी होण्यास कोणीही थांबवू शकणार नाही. शिवाय बॉलिवूड स्टार्सदेखील आता मराठीत पदार्पण करुन वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. त्यामुळे हे यश आता दर्शकांच्याच हाती आहे. 

* आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगाल?
- मी नुकतेच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. माझ्या आगामी 'डाय टुमॉरो' या हिंदी चित्रपटाची शूटिंग ग्रीस येथे नुकतीच आटोपली. हा एक कॉमेडी चित्रपट असून दर्शकांना नक्कीच आवडेल. शिवाय 'कास्टिंग आउच' नावाची शॉर्ट फिल्मदेखील डिरेक्ट केली आहे. विशेष म्हणजे यासाठी मला बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्डदेखील मिळाला आहे. 
Web Title: Marathi film will be successful if viewers join together.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.