In the Marathi film produced by Madhuri Dixit, she will get glory in this role | माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या मराठी चित्रपटात या भूमिकेत झळकणार वैभव मांगले

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या 'मेरे साई' या मालिकेत कुलकर्णीची भूमिका साकारणारा वैभव मांगले सध्या चांगलाच खूश आहे. वैभव हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. या मालिकेद्वारे त्याने हिंदी मालिकेतील त्याच्या इनिंगला सुरुवात केली आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्याने नुकत्याच साईन केलेल्या एका मराठी चित्रपटामुळे त्याचा आनंद गगनात मावत नाहीये. कारण बॉलिवूड दिवा माधुरी दीक्षित नेने या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान वैभवला एक सुखद धक्का मिळाला. त्याचे मेरे साईमधील काम पाहून माधुरी खूप प्रभावित झाली असून त्याच्या अभिनयाच्या कौशल्याबद्दल अधिक जाणून घेण्यास ती उत्सुक आहे असे तिने वैभवला सांगितले. याविषयी वैभवशी संपर्क साधला असता तो सांगतो, "मी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्यापासून माधुरीजी माझ्यासोबत कुलकर्णी या माझ्या व्यक्तिरेखेबाबात आणि मेरे साई या माझ्या मालिकेबाबत चर्चा करत आहेत. जेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांना माधुरीजींच्या प्रॉडक्शन कंपनीच्या माझ्या नव्या चित्रपटाबद्दल माहिती दिली, तेव्हा प्रत्येकजण माधुरीजी बरोबर आमची पण ओळख करून द्या असे सांगू लागले आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना वचन दिले आहे की, मी पुढच्या शुटिंग शेड्यूल दरम्यान त्यांना घेऊन जाईल. माधुरी दीक्षित यांच्या या चित्रपटात मी एका विनोदी भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे, या चित्रपटात मी माझ्या बायकोला घाबरतो असे दाखवण्यात आले आहे. माझी या नव्या चित्रपटातील भूमिका ही आताच्या मेरे साई भूमिकेच्या अगदी विरुद्ध आहे. मेरे साईमध्ये मी खलनायकाची भूमिका साकारत आहे.  
मेरे साई या मालिकेच्या आगामी भागांमध्ये एक श्रीमंत व्यापारी रत्नाकर विदेशातून शिर्डीला आला असल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्याचा शिर्डीला येण्यामागे एक हेतू असून रत्नाकर त्याच्या या वाईट हेतूमध्ये यशस्वी होईल का? साई बाबा रत्नाकरच्या तावडीतून द्वारका माई वाचवू शकतील का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मेरे साई या मालिकेच्या आगामी भागांमध्येच मिळणार आहेत. 

Also Read : माधुरी दीक्षितच्या बकेट लिस्ट या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?
Web Title: In the Marathi film produced by Madhuri Dixit, she will get glory in this role
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.