The Marathi film by Gashmir-Mrinemicha is named after it | नावामुळे रखडला गश्मीर-मृण्मयीचा हा मराठी सिनेमा

आजवर अनेक सिनेमा त्यातील बोल्ड कंटेंट किंवा मग कुणाच्या भावना दुखावणारा विषय यामुळे सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोव-यात अडकतो. त्यामुळे निश्चित झालेल्या तारखेला सिनेमा रिलीज होण्यास अडथळाही होतो. परिणामी कधी सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात येते किंवा मग काही तोडगा काढल्यानंतर सिनेमा प्रदर्शित होतो. आता मराठीतही असाच एक सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोव-यात अडकला आहे.चक्क सिनेमाच्या नावामुळे त्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखच ठरलेली नसल्याचे समजतंय. मृण्मयी देशपांडे आणि गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा 'रुबिक्स क्युब' या शीर्षकामुळे वादाच्या भोव-यात अडकला आहे. परिणामी या सिनेमा रिलीज होण्यापासून रखडलाय.एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार सिनेमाच्या नावात बदल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.त्यामुळे या  सिनेमावर थेट कोर्टाने स्थगिती आणली आहे.सिनेमाच्या नावात बदल झाल्यानंतर सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
महेश मांजरेकर  यांनी  ‘रूबिक्स क्यूब’ सिनेमाचे  दिग्दर्शन केले आहे.स्लोव्हेनिया, इटली, आणि स्वित्झर्लंड इथे या सिनेमाचे शूटिंग करण्यात आले आहे.सिनेमात गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे यांचा हटके लूक पाहायला मिळतोय.सोशल मीडियावर सध्या या सिनेमाचे 'अंतरीचा' हे गाणे तुफान हिट ठरतंय.या गाण्यातून गश्मीर आणि मृण्मयी दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळतेय. इटली, फ्रान्स आणि स्पेनसारख्या आकर्षक लोकेशन्सवर या सिनेमाचं शूटिंग झाल्यामुळे रसिकांना या आगामी सिनेमाची प्रतीक्षा आहे.
Web Title: The Marathi film by Gashmir-Mrinemicha is named after it
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.