Marathi film actress Mauli will make her acting debut in Marathi film industry | ​माऊली या चित्रपटाद्वारे ही बॉलिवूडमधील अभिनेत्री करणार मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश
​माऊली या चित्रपटाद्वारे ही बॉलिवूडमधील अभिनेत्री करणार मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश
सय्यामी खेरने मिर्झिया या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये एंट्री केली होती. ती प्रसिद्ध अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे तर तिची मावशी ही प्रसिद्ध अभिनेत्री तन्वी आझमी आहे. तिची आई उत्तरा म्हात्रे खेरने देखील मिस इंडिया हा किताब मिळवला होता. सय्यामीच्या पहिल्या चित्रपटात प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. खरे तर राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या मिर्झिया या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप साऱ्या अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट बॉक्स ऑफ्सवर अपयशी ठरला. त्यामुळे सय्यामीची म्हणावी तशी दखल बॉलिवूडने घेतली नाही. आता सय्यामी एका मराठी चित्रपटात झळकणार असून गेल्या कित्येक दिवसापासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. 
रितेश देशमुखचा माऊली हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात एक वेगळा रितेश प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील रितेशच्या भूमिकेविषयी त्याच्या फॅन्सना चांगलीच उत्सुकता लागली आहे. आता त्याच्या या चित्रपटात सय्यामी प्रेक्षकांना त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिची भूमिका काय असणार यावर चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. 
लवकरच 'माऊली' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे नुकतेच रितेशनेच सांगितले होते. लय भारी सिनेमाने रसिकांच्या पसंती मिळवत नवा रेकॉर्ड रचला होता. त्यामुळे रसिकांच्या अपेक्षांना तडा जाऊ न देण्याची मोठी जबाबदारी असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून काही तरी वेगळे घेऊन माऊली सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत असल्याचे रितेशने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. 'माऊली' या सिनेमात रितेश भूमिका साकारत असून या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहे. या सिनेमाची कथा क्षितीज पटवर्धनने लिहिली असून रितेशची निर्मिती संस्था या सिनेमाची निर्मिती करणार आहे. 
सय्यामी माऊलीद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत आता येत असली तरी तिची बहीण संस्कृती मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. संस्कृती खेरने हिंदी नाटकातून आपल्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर तिने स्वामी पब्लिक लिमिटेड या मराठी चित्रपटात काम केले होते. 

ritesh deshmukh saiyami kher

Also Read : रितेश देशमुखने अशा कॉमेडी अंदाजात केली ‘टोटल धमाल’च्या शूटिंगला सुरुवात!
Web Title: Marathi film actress Mauli will make her acting debut in Marathi film industry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.