Maratha actor will be seen in Golmaal 4 | ​गोलमाल 4 मध्ये झळकणार हा मराठमोळा अभिनेता

गोलमाल या चित्रपटाचे आजवर सगळेच भाग चांगलेच गाजले आहेत. त्यामुळे गोलमाल 4 हा चित्रपट केव्हा येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या दिवाळीत गोलमाल 4 प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून यात देखील तितकीच धमाल मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अजय देवगण, तुषार कपूर, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, कुणाल खेमु यांसारखे गोलमाल 3 मधील कलाकार आपल्याला या चौथ्या भागातही पाहायला मिळणार आहेत. त्यासोबत काही नवीन कलाकार गोलमाल 4 चा भाग असणार आहेत. करीना कपूर ऐवजी या भागात आपल्याला तब्बूला पाहायला मिळणार आहे. तसेच परिणिती चोप्रा, नील नितीन मुकेश, प्रकाश राज असे तगडे कलाकार देखील या चित्रपटाचा भाग असणार आहेत.

sachin khedekar

गोलमाल 4 मध्ये मराठी चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेता देखील झळकणार आहे. सचिन खेडेकर यांनी मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, पितृऋण, लालबाग परळ यांसारख्या मराठी चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अनेक हिंदी मालिका आणि हिंदी चित्रपटातही काम केले आहे. ते आता गोलमाल 4 या चित्रपटात दिसणार आहेत. याविषयी सचिन खेडेकर सांगतात, गोलमाल 4 या चित्रपटात माझी काय भूमिका आहे हे मी सांगू शकत नाही. पण या चित्रपटात मी एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी खूपच मजा आली. 
गोलमाल 4 हा चित्रपट रोहित शेट्टीने खूपच धमाल बनवला आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल अशी मला खात्री आहे. रोहित सोबत या आधी मी सिंघम या चित्रपटात काम केले होते. पुन्हा एकदा रोहित सोबत काम करायला खूप मजा आली. एक दिग्दर्शक म्हणून त्याला काय हवे आहे याची त्याला चांगलीच कल्पना असते. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला असतो.
गोलमाल 4 या चित्रपटाचे नाव गोलमाल अगेन असे असून आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटाला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहे. 

Also Read : 'गोलमाल 4' नंतर अजय देवगण आणि रोहित शेट्टी तयार करणार 'सिंघम 3'
Web Title: Maratha actor will be seen in Golmaal 4
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.