Manva Naik Website Producer | ​मनवा नाईक वेबसिरिजची करणार निर्मिती

मनवा नाईकने आजवर अनेक मराठी चित्रपटात, नाटकात, मालिकांमध्ये काम केले आहे. मनवाने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीमध्ये देखील तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. बा बहू और बेबी, तीन बहुराणीयाँ यांसारख्या मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत तिने जोधा अकबर या हिंदी चित्रपटात देखील काम केले होते. नो एंट्री पुढे धोका आहे, जाऊ द्या ना बाळासाहेब, फक्त लढ म्हणा यांसारख्या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. अभिनयात यश मिळाल्यानंतर मनवा दिग्दर्शनाकडे वळली. तिने पोर बाजार या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे तिने केलेले दिग्दर्शन प्रेक्षक आणि समीक्षक दोघांना देखील आवडले होते. दिग्दर्शनासोबत तिने निर्मितीक्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. चूक भूल द्यावी घ्यावी या तिच्या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. सरस्वती या मालिकेची देखील निर्माती तीच आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकत आहे.
अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळाल्यानंतर आता मनवा एका वेगळ्या क्षेत्राकडे वळली आहे. मनवा आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. ती एका वेबसिरिजची निर्मिती करणार आहे. या वेबसिरिजची जोरदार तयारी ती सध्या करत आहे. तिची ही वेबसिरिज अतिशय वेगळ्या विषयावर असून त्यावर ती काम करत आहे. या वेबसरिजच्या टीमममध्ये मराठीतील अनेक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. या वेबसिरिजचे डी.ओ.पी. अमोल गोळे असून त्यांनी आजवर मराठी चित्रपटसृष्टीत खूप चांगले काम केले आहे. या वेबसिरिजचे दिग्दर्शन स्वप्ननील जयकर करणार असून स्वप्ननील हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. 
मनवासोबतच या वेबसिरिजची निर्मिती वृषाली शिंदे आणि शिवांगी केणी करत आहेत. मनवाची वेबसिरिज कोणत्या विषयावर असणार आणि यात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार याबाबत अद्याप मनवाने तिच्या फॅन्सना सांगितले नसले तरी त्यांना तिच्या या वेबसिरिजची चांगलीच उत्सुकता लागली आहे. 

Also Read : MUST SEE: मनवा नाईकचा वेडींग अल्बम
Web Title: Manva Naik Website Producer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.