Mangesh Desai Lal Bhatti is doing this for the film | ​मंगेश देसाई लाल बत्ती चित्रपटासाठी अशाप्रकारे घेतोय मेहनत

एक अलबेला या चित्रपटातील मंगेश देसाईच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले होते. मंगेशने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आता तो कट्टी बट्टी मालिकेत देखील प्रेक्षकांना दिसणार असून या मालिकेत तो शिक्षकाची भूमिका साकारणार आहे. 
मंगेश कट्टीबट्टी या मालिकेसोबतच आणखी एका गोष्टी मध्ये सध्या व्यग्र आहे. मंगेश लाल बत्ती या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटासाठी तो विशेष मेहनत घेत आहे. लाल बत्ती या चित्रपटाची कथा खूपच वेगळी आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटातील भूमिकेवर मंगेश विशेष मेहनत घेत आहे. लाल बत्ती या चित्रपटात प्रेक्षकांना श्रीकांत सोंडे यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळणार आहे. श्रीकांत सोंडे हे ठाण्यातील क्यूआरटीमध्ये अधिकारी होते. त्यांच्याकडे एक कमांडो ट्रेनिंगसाठी आला होता. त्या मुलाला ट्रेनिंग देत असताना श्रीकांत यांना त्याच्या खऱ्या आयुष्याविषयी कळले. या मुलाचे आई हरवली असल्याचे त्या मुलाने त्यांना सांगितले. त्याच्या हरवलेल्या आईचे काय झाले हे प्रेक्षकांना लाल बत्ती या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तो क्यूआरटी अधिकाऱ्याची भूमिका साकारत असल्याने त्याच्यासाठी श्रीकांत सोंडेंसारखी शरीरयष्ठी बनवणे गरजेचे होते. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. 
मंगेशने काही महिन्यांपूर्वी एक अलबेला या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात अभिनेते भगवान दादा यांच्या भूमिकेत तो दिसला होता. या साठी त्याने काही किलो वजन वाढवले होते. पण आता लाल बत्ती या चित्रपटासाठी त्याने कित्येक किलो वजन कमी केले असून तो एकदम फिट दिसत आहे. एवढेच नव्हे तर त्याने या चित्रपटासाठी क्यूआरटीच्या जवानांसोबत ट्रेनिंग देखील घेतले आहे. 
लालबत्ती या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरिश मोहिते यांनी केले असून कथा अरविंद जगताप यांनी लिहिली आहे. या चित्रपटात मंगेशसोबतच भार्गवी चिरमुले, मनोज जोशी यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. 

Also Read : ​'कट्टी बट्टी' मालिकेत मंगेश देसाई साकारणार ही महत्वाची भूमिका!
Web Title: Mangesh Desai Lal Bhatti is doing this for the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.