Mahesh Manjrekar's daughter's bold photo; Ready to play Bollywood | समोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज

महेश मांजरेकर यांची लेक अश्वमीचे काही बोल्‍ड फोटो नुकतेच समोर आले आहेत. अश्वमीने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.सोशल मीडियावर ती बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती सुरुवातीपासून आपले फोटो शेअर करत आली आहे. सुरुवातीचे अश्वमीचे  फोटो आणि आताचे फोटो पाहिले तर तिच्यामध्ये आलेला बदल तुम्हालाही सहज लक्षात येईल. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अश्वमीचा पूर्वीपेक्षा लूक अधिक फिट आणि मेंटेन तसंच बोल्ड, ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या फोटोतील अंदाज कुण्या ग्लॅमरस दिवापेक्षा कमी नाही.तिचा हा मेकओव्हर, वजन कमी करणे, स्टायलिश दिसणे म्हणजे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याची चाहूल तर नाही ना अशा अनेक चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. (Also Read:अखेर सलमान खानच्या 'दबंग ३'बाबत बोलली मौनी रॉय
 


बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीत गॉडफादर म्हणून ओळखला जातो.अनेक नवोदित अभिनेत्रींना त्याने रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल टाकण्याची पहिलीवहिली संधी मिळवून दिली.सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह, स्नेहा उल्लाल, झरीन खान अशी किती तरी नावं यांत घेता येतील.याच यादीत आता आणखी एका मराठमोळ्या मुलीच्या नावाची भर पडणार आहे.ही मराठमोळी मुलगी म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक अश्वमी. 'दबंग-3' या आपल्या आगामी सिनेमातून सलमान अश्वमीला रुपेरी पडद्यावर लॉन्च करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. 'दबंग-३ हा सिनेमा दबंगचा सिक्वेल नसून प्रिक्वेल असणार आहे. त्यामुळे दबंग सिनेमात रज्जो साकारणा-या सोनाक्षी सिन्हाचा दबंग-३ सिनेमातून पत्ता कट झाल्याचे बोललं जात आहे. रज्जो हिला भेटण्याआधी चुलबूल पांडे कसा होता याची कहाणी दबंग-३ सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच या सिनेमात रज्जो साकारणा-या सोनाक्षीची निवड झाली नसल्याचे बोललं जात आहे. दबंग सिनेमात रज्जोच्या वडिलांची भूमिका महेश मांजरेकर यांनी साकारली होती. त्यामुळे दबंग-३ सिनेमात अश्वमीसह महेश मांजरेकरही झळकल्यास बाप-लेकीची रिअल जोडी रुपेरी पडद्यावर एकाच सिनेमात पाहण्याचा योग जुळून येईल. 

 

याशिवाय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी राय दबंग-३ सिनेमात आयटम नंबर करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. काळवीट शिकार प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर सलमाननं शूटिंगला सुरुवात केली आहे. जेलमधून बाहेर येताच त्याने 'रेस-३' सिनेमाचं शुटिंग पूर्ण केले असून 'दबंग-३' सिनेमाची तयारी सुरु केली आहे.त्यामुळे लवकरच या सिनेमाच्या स्टारकास्टची घोषणा होण्याची शक्यता आहे.'दबंग-३' सिनेमात अश्वमीची निवड झाल्यास बी-टाऊन गाजवण्यासाठी आणखी एक मराठी मुलगी सज्ज असणार हे मात्र नक्की. 
Web Title: Mahesh Manjrekar's daughter's bold photo; Ready to play Bollywood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.