Mahesh Manjrekar and Makrand Anaspure will be seen together | महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे झळकणार एकत्र

विषयांचे वैविध्य असलेल्या मराठी चित्रपटांची निर्मिती सातत्याने होऊ लागली आहे. ‘Thank U विठ्ठला’ या हटके शीर्षकाचा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. एम.जी.के प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांची असून कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांच आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन ‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. येत्या ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेलं आहे.‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा पहाता येईल.महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकुब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद साफई, सतीश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, शिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत.चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. संवाद एम.सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचं आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. संगीत रोहन – रोहन तर नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.आगमी डॉ. तात्याराव लहाने  सिनेमात मकरंद अनासपुरे डॉ. लहाने यांची भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा 6 ऑक्टोबर २०17  रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता या चित्रपटाची टेड पुढे ढकलण्यात आली आहे. अजून चित्रपटाचे काम बाकी असल्यामुळे आता हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे.तसेच हेश मांजरेकर आगामी हिंदी साहो सिनेमात झळकणार आहे. त्यापूर्वी या दोघांची जोडी  ‘Thank U विठ्ठला'सिनेमात एकत्र पाहाला मिळणार आहे.
Web Title: Mahesh Manjrekar and Makrand Anaspure will be seen together
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.