Mad bf The promotion of the movie | वेडा बी.एफ. सिनेमाचे हटके प्रमोशन

मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट आणि मुस्तफा मलिक निर्मित, अल्ताफ शेख दिग्दर्शित वेडा बी.एफ. या मराठी चित्रपटाचे अतरंगी प्रमोशन सध्या सगळीकडे चर्चेत आहे. मराठी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अल्ताफ शेख यांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. वेडा बी.एफ. सिनेमा पाहणाऱ्यांसाठी लकी बाईक बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहे. १९ जानेवारीपासून हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले यावेळी अहमदनगर जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील देखील उपस्थित होते. यावेळी पाटलांनी सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छां देखील दिल्या आणि हिंदू - मुस्लीम सारखा विषय घेऊन त्यावर सकारात्मक सिनेमा केल्याचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.

पुण्यात राहून अनेक वर्षे सिनेमा क्षेत्रात छोटी मोठी कामं करून अल्ताफ शेख यांनीं या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. विशेष बाब म्हणजे या सिनेमातून होणाऱ्या नफ्यातून दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार असल्याचे अल्ताफ शेख यांनी सांगितले आहे.

सिनेमात नागेश भोसले, प्राजक्ता देशपांडे, डॉ.विशाखा घुगे, सागर गोरे, विजय नवले, अल्ताफ शेख, शैलेश पितांबरे, आणि वृंदाबाळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिवाय अल्ताफ राजा यांची पहिली मराठी कव्वाली देखील या सिनेमातून बघायला मिळणार आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य देखील या सिनेमातून दर्शविण्यात आले आहे.

वेडा – बी.एफ.सिनेमाबद्दल अल्ताफ शेख सांगतात कि, यात हिंदू – मुस्लीम यांच्यातील ऐक्य कसे टिकून राहील हे दाखवण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचा असीम भक्त बाबूलाल पठाणच्या (नागेश भोसले) कुटुंबाची ही गोष्ट आहे. ज्याचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. त्याचेही शिवाजी महाराजांवर तेवढेच प्रेम आहे. पुढे त्याची मुलगी आणि बहिण हिंदू मुलांच्या प्रेमात पडतात..पुढे काय होते हे सिनेमात पाहण्यासारखे आहे. सिनेमात नागेश भोसले, विनीत बोंडे, प्राजक्ता देशपांडे, डॉ. विशाखा घुगे, सागर गोरे, विजय नवले, अल्ताफ शेख, शैलेश पितांबरे आणि वृंदाबाळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमात पोवाडा, कव्वाली, प्रेम गीत, विरह गीत अशा प्रकारांचा समावेश आहे. मोनो अजमेरी यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. १९ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. 
Web Title: Mad bf The promotion of the movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.