The Lord gave the anthem of 'God' | 'देवा' च्या अॅन्थम साँगला प्रभूदेवाने दिली दाद

'देवा एक अतरंगी' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.. इनोव्हेटिव्ह फिल्म्स  आणि प्रमोद फिल्म्स निर्मित या सिनेमाचे नुकतेच, प्रसिद्ध कॉरियोग्राफर प्रभुदेवा यांच्या ट्वीटद्वारे एन्थम साँग लाँच करण्यात आले. नृत्यदिग्दर्शनात 'देवा' असणा-या प्रभूदेवाने 'देवा' चे हे एन्थम सॉंग आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकत, देवाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. अजय गोगावले याचा कमालीचा आवाज या गाण्याला लाभला असून, क्षितीज पटवर्धन लिखित या गाण्याचे अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. देवाच्या रंगबेरंगी व्यक्तिमत्वाला बोलके करणारे हे गाणे लोकांनादेखील खूप आवडत आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवा' हे अतरंगी पात्र अंकुश चौधरीने साकारले असून, विविध रंगानी नटलेल्या या गाण्यात प्रेक्षकदेखील रंगून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 
सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात... छोट्या पडद्यावरच्या शोमध्ये येऊन सिनेमाचं प्रमोशन करण्याचा फंडा हिट झाला असताना  देवा या आगामी मराठी सिनेमाने मात्र वेगळी वाट धरलीय.मोठा गाजावाजा न करता शांततेत देवा या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.आता तुम्हीही विचारात पडला असणार की शांततेत जोरदार प्रमोशन कसं बरं होत असेल ? तस होय, देवा सिनेमाने प्रमोशसाठी एक भन्नाट कल्पना शोधुन काढली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या २००हून अधिक ए.टी.एम. मध्ये या सिनेमाचा टीझर दाखविला जात आहे. हा टीझर २० सेकंदाचा असून, यामार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘देवा’ सिनेमाचा बोलबाला केला जात आहे. विशेष म्हणजे, ए.टी.एम.द्वारे अशाप्रकारे सिनेमाचा टीझर दाखवण्याची हि पहिलीच वेळ असून,ह्या अतरंगी संकल्पनेचे कौतुकदेखील होताना दिसून येत आहे.आपल्या अभिनयाबरोबरच भूमिकेतदेखील नाविण्यपण जपणाऱ्या अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची अशी होत असलेली प्रसिद्धी,प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय ठरत आहे.
Web Title: The Lord gave the anthem of 'God'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.