Look at the wife of Shashank Ketkar, who was seen in Princess Luc, | प्रिन्सेस लूकमध्ये दिसली शशांक केतकरची पत्नी, पाहा असा होता अंदाज

लग्नानंतर शशांकने सोशल मीडियावर पत्नी प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यात त्याने पत्नीविषयीचे त्याचे प्रेम व्यक्त केले. लग्नात नववधू  प्रियांकाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये तिचे सौदर्य आणखी खुलल्याचे पाहायला मिळाले होते.लग्नात कॅमे-यात टीपलेले खास क्षण खुद्द शशांकनेच त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोला समर्पक अशी कॅप्शनही दिली होती. ''हसणं, आनंदात राहणं, समजून घेणं हे खरंतर सोपं असतं हे जाणवलं तुझ्यामुळे''अशी कॅप्शन शेअर केलेल्या फोटोत शशांकने दिली होती.याऊलट रिसेप्शनमध्ये प्रियांकाने लूक चेंज करत सा-यांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.गोल्डन रंगाचा गाऊन प्रियांकाने यावेळी परिधान केला होता. तर अगदी प्रियांकाच्या ड्रेसिंगशी मिळता जुळता कोट शशांकने घातला होता.या रिसेप्शनमध्ये दोघांचीही हटके  स्टाइल पाहायला मिळाली.यावेळी प्रियांका अगदी परीप्रमाणेच भासत होती.

cnxoldfiles/a>प्रियांकाही शशांकची खास मैत्रिण आहे.अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शशांक आणि प्रियांकाच्या साखरपुड्याचा फोटो शेअर करत सा-यांना शशांकची गुड न्युज चाहत्यांसह शेअर केली होती.साखरपुडा झाल्यापासून शशांकच्या लग्नाचे काऊंड डाऊन सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.शशांकचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पारंपारीक विवाह पद्धतीने पार पडला.या लग्नसोहळ्याला शशांक आणि प्रियांकाचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.या नवदाम्पत्याच्या विविध अदा,लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.फोटोंमध्ये नववधू प्रियांकाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळाले.सोशल मीडियावर शशांकच्या लग्नाचे फोटो पाहून रसिकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.
Web Title: Look at the wife of Shashank Ketkar, who was seen in Princess Luc,
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.