Little chimukaleo 'caterpillar'! | ​लहान चिमुकलेही झाले ‘सैराटमय’ !


संपूर्ण महाराष्ट्रासह भारत आणि भारताबाहेरील मराठी चाहत्यांना ‘सैराट’ चित्रपटाने याड लावलयं. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात चित्रपटगृहात दाखल झालेल्या नागराज मंजुळेच्या या चित्रपटाची जादू अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. ‘सैराट’ चे कथानक आणि गाण्यांमुळे त्याची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. मात्र ह्याच गाण्यांचा आता एक आगळावेगळा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. ‘सैराट झालं जी’ गाण्यावर चित्रीत करण्यात आलेल्या परशा आणि आर्चीच्या प्रेमभावना आणि रोमँटिक क्षण मिनी सैराटच्या माध्यमातून लहान मुलांवर अगदी जसाच्या तसा पुनर्चित्रीत करण्यात आला आहे.
यूट्युबवर व सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्याला नेटिझन्सचीही चांगली पसंती मिळत आहे. ‘सैराट’च्या गाण्यांवर चित्रीत करण्यात आलेल्या लहान मुलांचा मिनी सैराट व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
यश मीडियाकडून या व्हिडिओचे शुटींग करण्यात आले असून. 
यात आर्ची, परशा, लंगड्या, बाळ्या, सल्ल्या व आनीच्या भूमिका लहान मुलांनीच केल्या आहेत. चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीचे हुबेहुब हावभाव या लहान मुलांनी कॅमेºयासमोर दिले आहेत. सैराट झालं जी.. हे गाणे करमाळ्यातील ज्या मंदिरात शूट झाले होते त्याच मंदिरात व बारवमध्ये शुटींग करण्यात आले आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेले वाळलेले झाडही आता प्रसिद्ध झाले आहे. हे झाडही मिनी सैराटमध्ये दिसत आहे. 


Web Title: Little chimukaleo 'caterpillar'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.