'Lil-er Jhaam Jeepam Shivani Bawkar will be seen in this movie | 'लागिर झालं जी'फेम शिवानी बावकर झळकणार या सिनेमात

छोट्या पडद्यावर नव्यानं दाखल झालेली मालिका 'लागिर झालं जी'ही रसिकांमध्ये सुपरहिट ठरत आहे. ही मालिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली आहे. या मालिकेत शीतलची भूमिका अभिनेत्री शिवानी बावकर साकारत आहे.मालिकेतला शीतलचा अंदाज रसिकांना चांगलाच पसंत पडतो आहे. त्यामुळेच टीव्हीमधली शीतल म्हणजेच शिवानी काय करते,मालिकेव्यतिरिक्त का करते जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता आहे. या मालिके व्यतिरिक्त शिवानी बावकर आता मोठा पडद्यावरही झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. 'उंडगा' या सिनेमातून ती रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात तिचा लूकही मालिकेप्रमाणेच पाहायला मिळत आहे.सध्या सिनेमाच्या निमित्ताने शिवानीचा नववधू लूक व्हायरल झाला आहे.हा फोटो पाहताच रसिकांना शिवानीने लग्न केले की काय असे प्रश्न पडल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाहीतर तिच्या चाहत्यांनी तिला थेट सोशल मीडियावर लग्न केले की काय ? असे प्रश्न विचारताना दिसतायेत. मात्र शिवानीचा हा लूक तिच्या आगामी सिनेमातला आहे.सोशल मीडियावर तिच्या या फोटोला खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स मिळतायेत. 

अगदी अल्पावधीतच शिवानीने रंगवलेली शितली ही भूमिका रसिकांना पसंत पडू लागली आहे. 'लागिर झालं जी' मालिका शीतल आणि अजिंक्यच्या जोडीवर आधारित असून खूप कमी वेळेत या मालिकेने रसिकांची पसंती मिळवली आहे.शिवानीच्या आगामी सिनेमाची गाणी सध्या  सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.त्यामुळे छोट्या पडद्यानंतर रूपेरी पडद्यावर झळकण्यासाठी शिवीनीही खूप उत्सुक आहे.विक्रांत वरदेने 'उंडगा' सिनेमाचे दिग्दर्शन केले असून सिनेमात चिण्मय संत,स्वप्निल कणसे,संग्राम समेळ,अरूण नलावडे आदींच्या भूमिका आहेत.हा सिनेमा 4 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Web Title: 'Lil-er Jhaam Jeepam Shivani Bawkar will be seen in this movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.