Lessons of the audience to Archie's program | आर्चीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पाठ

 
         आर्ची आणि परशा हे नाव आता सर्वांच्याच परिचयाचे झाले आहे. सैराट सिनेमाची भन्नाट झिंग प्रेक्षकांवर चढलेली पहायला मिळायची. आर्ची आणि परशा एखाद्या कार्यक्रमाला येणार हे समजले कि प्रेक्षक तुफान गर्दी करुन तिथे जायचे. आपल्या लाडक्या कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी लोक अक्षरश: झुंबड उडायची. परंतु आता या लाडक्या सैराट कपलची क्रेझ ओसरली कि काय असा प्रश्न पडला आहे. त्याला कारणही तसेच आहे म्हणा, गेले कित्येक दिवस ज्या नवोदित कलाकारांना बाऊन्सर शिवाय फिरणे अशक्य होते अशा आर्ची आणि परशाच्या लातूरच्या एका कार्यक्रमात प्रेक्षकच नसल्यामुळे आयोजकांवर कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढवली. लातूरच्या क्रीडा संकुलात रविवारी शाळेच्या मदत निधीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये सैराट आणि चला हवा येऊ द्या मधील कलाकार सहभागी होणार होते. लातूरमधील कार्यक्रमालाही मोठी गर्दी जमेल, अशी आयोजकांची अपेक्षा होती. मात्र, कार्यक्रम अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला तरी तिकीट विक्रीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने हा कार्यक्रम चक्क रद्द करत असल्याचे आयोजकांनी सांगितले. आता बोला, प्रेक्षकांनी चक्क आर्चीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. ज्या आर्ची आणि परशाने संपूर्ण जगाला वेडे लावले आता त्यांना पाहण्यात प्रेक्षकांना काडीमात्र इंटरेस्ट नसल्याचेच दिसून येत आहे. 

Web Title: Lessons of the audience to Archie's program
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.