Know what made a record Amrita Khanvilkar on Twitter | जाणून घ्या कोणता विक्रम केला ट्विटरवर अमृता खानविलकर

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर अमृता खानविलकर या नावाला धरून खूप चर्चा झाल्या आहेत. कधी अमृताचा हिंदी मधला वाढताप्रवास असो कि तिच्या फॅशनबाबत. मात्र खास चर्चा होती ती तिच्या ट्विटर अकाऊंटची. 9 हजार ट्विटर फॉलोअर्स झाल्यानंतर अमृता खानविलकरच्या सगळ्या फॅन्सना उत्सुकता होती ती अमृता 10 हजार फॉलोअर्सचा कधी गाठणार याची. अमृताने नुकता ट्विटरवर 10 हजार फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे आणि ऐवढे फोलोअर्स असणारी अमृता खानविलकर पहिली मराठी अभिनेत्री ठरली. 

ट्विटरवर जवळपास ५० च्या घरात तिच्या नावाचे फॅनक्लब्स आहेत. सगळ्या सोशल मीडिया साईट्सवर अमृताचा असणारा कमाल अँपिअरन्स हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. अमृता खानविलकर मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्री प्रसिद्ध आहे. तिची बॉलिवूडस्टार रणवीर सिंगशी असणारी घट्ट मैत्रीही आपल्याला तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिसते. 

यासगळ्यावर अमृता म्हणते कि ''खूप छान वाटतंय आज, जेव्हा ट्विटर अकाउंट ओपन केलेलं तेव्हा 10 हजार फोलोअर्स असणं म्हणजे काय हे माहीत ही नव्हतं. पण आज ते शक्य झालंय याचं सगळं श्रेय जातं ते माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या फॅन्सना. त्यांच्यामुळेच खरंतर हे घडून आलंय. 10 हजार हा फक्त मी एक नंबर नाही समजत तर पुढे काम करण्यासाठीची मिळालेली एक ऊर्जा मानते.''

अमृता डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळे सिझन हिट झाले आहेत.  नच बलिये या कार्यक्रमात पती हिमांशू मल्होत्रासोबत सहभागी झाली होती आणि या कार्यक्रमाचे विजेतपद देखील तिला मिळाले होते. ती एक चांगली डान्सर असल्याचे बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी देखील या कार्यक्रमात म्हटले होते.

ALSO READ :  कोणती गोष्ट आहे जी अमृता खानविलकरला स्वस्थ बसू देत नाहीये?

अमृता ही एक चांगली अभिनेत्री आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तिने फक्त लढ म्हणा, सतरंगी रे यांसारख्या मराठी चित्रपटात तर फूंक २, फूंक यांसारख्या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. 
Web Title: Know what made a record Amrita Khanvilkar on Twitter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.