Know the love and love of Shreyas! | जाणून घ्या श्रेयस आणि दीप्तीच्या प्रेमाची गोष्ट!

त्याने तिला पाहिले पहिल्यांदा आणि पहिल्याच नजरेत तिनं त्याला क्लीनबोल्ड केलं.तिला पाहताच त्याच्या दिल की घंटी बजने लगी आणि ती त्याच्या आयुष्यात येताच त्याचं आयुष्यच जणू पालटलं. ही सगळी गोष्ट आहे अभिनेता श्रेयस तळपदेची. व्हॅलेन्टाईन डेच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळंच वातावरण जणू रोमँटिक बनलं आहे.अशा प्रेमाच्या रंगात न्हाऊन गेलेल्या वातावरणात श्रेयस आणि त्याची पत्नी दीप्ती यांच्या प्रेमाची गोष्ट आगळीवेगळी ठरते.13 वर्षांपूर्वी रेशीमगाठीत अडकलेल्या श्रेयस आणि दीप्तीची लव्ह स्टोरी सिनेमातील कथेला साजेशीच म्हणावी लागेल.कॉलेजमधील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्याचे निमित्त ठरलं आणि दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.त्यावेळी श्रेयसला दीप्ती पाहताक्षणी आवडली तर दीप्तीला श्रेयसचा साधेपणा भावला.दोघांचं प्रेम खुलू लागलं आणि दोघंही लग्नबंधनात अडकले.लग्नाच्या तेरा वर्षानंतरही दोघांतील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.दीप्ती खंबीरपणे श्रेयसच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते,त्याला पाठिंबा देते. दुसरीकडे श्रेयसही आपल्या सगळ्या यशाचे श्रेय दीप्तीलाच देतो.करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी दीप्ती पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि आपला विश्वास कधीही ढळू दिला नाही असं श्रेयस सांगतो.जीवनात जे काही यश मिळाले ते फक्त दीप्ती ठामपणे पाठिशी उभी राहिल्याने आणि तिने साथ दिल्याने असे तो अभिमानाने सांगतो.दुसरीकडे दीप्तीसुद्धा श्रेयसचं कौतुक करताना थकत नाही.दोघांमध्ये कितीही भांडणं झाली तरी काही क्षणात ते विसरतो असं ती सांगते.कितीही कडाक्याचे भांडण झालं तरी नव्या दिवसाची सुरुवात गोड बोलून करतो आणि तेच आपल्या यशस्वी नात्याचे गमक आहे असं हे रोमँटिक कपल सांगते.व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने श्रेयसला त्याच्या पहिल्या डेटची आठवण झाली.त्यावेळी श्रेयस दीप्ताला ठाण्यात भेटला होता.मात्र त्यावेळी ठाण्यातील कोणत्या हॉटेलमध्ये तिला न्यायचं असा प्रश्न निर्माण झाला होता अशी आठवण त्याने सांगितली. 


तसेच लवकरच श्रेयस रसिकांच्या भेटीला दोन नवे सिनेमा घेवून येणार आहे.लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.याशिवाय खुद्द श्रेयस तीन सिनेमाच्या लिखाणात बिझी असल्याचेही त्याने सांगितले.

Web Title: Know the love and love of Shreyas!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.