अश्लील बोलल्याशिवाय मराठी भाषेला लाभणार नाहीत का सुवर्ण दिवस?, केतकीचा ट्रोलर्सना प्रतिप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 08:40 PM2019-06-13T20:40:02+5:302019-06-13T20:40:53+5:30

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला सोशल मीडियावर हिंदी भाषेत बोलल्यामुळे ट्रोल करण्यात आलं आहे.

Ketki Chitale asking re-question to trollers on Social Media | अश्लील बोलल्याशिवाय मराठी भाषेला लाभणार नाहीत का सुवर्ण दिवस?, केतकीचा ट्रोलर्सना प्रतिप्रश्न

अश्लील बोलल्याशिवाय मराठी भाषेला लाभणार नाहीत का सुवर्ण दिवस?, केतकीचा ट्रोलर्सना प्रतिप्रश्न

googlenewsNext

सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रेटींना त्यांच्या फोटो, व्हिडिओ आणि स्टेटमेंटमुळे बऱ्याचदा ट्रोल केले जाते. मात्र मराठी चित्रपटसृष्टीत ट्रोल करण्याचे प्रमाण तितके नाही. मात्र आता मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला ट्रोल करण्यात आलं आहे.

केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. त्या व्हिडिओत तिने आपले सर्व फॉलोअर्स हे मराठी नसून हिंदी इंग्लिश देखील आहेत असे सांगत व्हिडिओमध्ये हिंदीत बोलणार असल्याचे सांगितले आणि ती हिंदीत बोलत असल्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. पण तिनेदेखील ट्रोलर्सना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

केतकी चितळेचा हा व्हिडिओ अनेकांनी शेअर करून तिला मराठीची लाज वाटत असल्याची टीका करून तिला ट्रोल केले. इतकेच नाही तर अनेकांनी अतिशय वाईट पद्धतीने तिच्यावर टीका केली. तिच्यावर केलेल्या टीकेला तिने नुकतेच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. तिने टीका करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. इतकेच नाही तर मराठीची शाळा देखील घेतली. 


तिने मी देश का सोडू मला लाज वाटत नाही, असे देखील व्हिडिओत म्हटलं. मराठी अस्मिता व मराठी भाषेचा इतका अभिमान वाटत असेल तर लॅटीन किंवा इंग्रजी शब्दांत का लिहिले, असा जाब तिने विचारले आहे. 


ट्रोलर्सनी केतकीला खूप घाणेरड्या शब्दांत ट्रोल केले आहे. तुमची मराठी भाषा इतकी कमकुवत आहे का, की माझा रेप केल्याशिवाय तिला तिचे सुवर्ण दिवस लाभणार नाही आहेत, असा सवाल केतकीनं व्हिडिओत केला आहे. 

Web Title: Ketki Chitale asking re-question to trollers on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.