Kedar Shinde's daughter will enter the industry? | केदार शिंदे यांची मुलगी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणार?

 बॉलिवुड असो वा मराठी इंडस्ट्री सेलेब्रिटींच्या मुलांविषयी प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. आता हेच पाहा ना दिग्दर्शक केदार शिंदे यांची मुलगी साना शिंदे हिने नुकतेच १८ व्या वयात पदापर्ण केले आहे. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी एक झक्कास फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. बाप लेकीचा हा लय भारी फोटो पाहून प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला की, साना इंडस्ट्री प्रवेश करणार आहे का? प्रेक्षकांच्या या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी लोकमत सीएनएक्सने केदार शिंदे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, सानाचे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न आहे.पण सध्या तिने पहिल्यांदा पूर्णपणे शिक्षणाकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे. तसेच इंडस्ट्रीमध्ये पदापर्ण करण्याविषयी मी तिला कधी विचारले नाही. तसेच तिला तिचे करिअर कशात करायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आम्ही तिला दिले आहे. आम्ही तिला कधी ही कोणत्या ही गोष्टीसाठी फोर्स केला नाही. जरी तिला अभिनेत्री बनायचं असेल तर अलवेज वेलकम. फक्त कष्ट करण्याची तयारी तिने ठेवावी. शेवटी मेहनतीला पर्याय नाही. तिला तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागेल. 

Web Title: Kedar Shinde's daughter will enter the industry?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.