John Abraham's Savita Damodar Paranjpe will be released on this date of Marathi Film | ​जॉन अब्राहमचा सविता दामोदर परांजपे हा मराठी चित्रपट या तारखेला होणार प्रदर्शित
​जॉन अब्राहमचा सविता दामोदर परांजपे हा मराठी चित्रपट या तारखेला होणार प्रदर्शित
मराठी चित्रपटाचे वेध आता बॉलिवूड कलाकारांनादेखील लागले आहेत. प्रियांका चोप्रा, अजय देवगण, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांनी आतापर्यंत मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटर या चित्रपटाला तर यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारातदेखील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि आता जॉन अब्राहम मराठी चित्रपटाकडे वळला आहे.
जॉन एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटात मराठीतील अनेक चांगले कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जॉनने चित्रपटाची निर्मिती करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. त्याने याआधी विकी डोनर या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. तसेच मद्रास कॅफे, रॉकी हँडसम, फोर्स टू या चित्रपटाचीदेखील त्याने निर्मिती केली आहे आणि आता तो मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 
सविता दामोदर परांजपे असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. स्वप्ना वाघमारे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी या आधी फुगे, मितवा, तुला कळणार नाही यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची घोषणा जॉनने गेल्या काही महिन्यांपूर्वी केली होती. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. हा चित्रपट ३१ ऑगस्टला प्रदर्शित होत असून अलीकडेच पार पडलेल्या अकराव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोपाला ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर शो सादर करण्यात आला होता.
सविता दामोदर परांजपे हा एक सायकोलोजिक थ्रिलर सिनेमा आहे. ही एक सूड कथा असून महिलेला झोका देणाऱ्या पुरुषाचा ती सूड कशाप्रकारे घेते हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सविता दामोदर परांजपे या गाजलेल्या नाटकावर हा चित्रपट बनवला गेला असून या नाटकात रिमा लागू यांची मुख्य भूमिका होती. 

Also Read : खुल्या जीपमध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत फिरताना दिसला जॉन अब्राहम; व्हिडीओ झाला व्हायरल!Web Title: John Abraham's Savita Damodar Paranjpe will be released on this date of Marathi Film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.