Janni said about the second marriage of 'real life' ....... | ‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्नाबद्दल जान्हवी म्हणाली की …….

छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती जोडी म्हणजे जान्हवी आणि श्री. 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून ही जोडी घराघरात पोहचली. अल्पावधीतच जान्हवी साकारणारी तेजश्री प्रधान आणि श्री साकारणारा शशांक केतकर रसिकांचे लाडके बनले.मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच तेजश्री आणि शशांक यांच्यात जवळीक वाढली. आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या निर्णयामुळे रसिकही खूप खूश होते. मात्र रसिकांचा हा आनंद फार काळ टिकून राहिला नाही. कारण लग्नानंतर वर्षभरातच शशांक आणि तेजश्री यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाल्यामुळे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी घटस्फोट घेतला. अवघ्या एका वर्षातच दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे रसिकही नाराज झाले.रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या जोडीमध्ये अशाप्रकारे अचानक दुरावा निर्माण झाल्याने रसिक दुःखी होते. त्यातच शशांकने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला.पेशाने वकील असणा-या प्रियांकासह शशांक पुन्हा रेशीमगाठीत अडकला.दुस-या लग्नानंतर शशांकला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. रसिकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.मात्र या लग्नावर तेजश्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.आता पहिल्यांदाच तेजश्रीची यावर प्रतिक्रिया आलीय.शशांकला ट्रोल करण्याबाबत विचारलं असता त्यावर तेजश्रीने नाराजी व्यक्त केलीय.एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय दोघांनी सहमतीने घेतला होता. त्यामुळे पुढील आयुष्याचा निर्णय घेण्याचा त्याला अधिकार आहे.अशावेळी सोशल मीडियावर लोक ट्रोल करतात याचं नक्कीच खूप वाईट वाटतं असे तेजश्रीने एका रेडिओ मुलाखतीत सांगितले आहे. 


होणार सून मी या घरची या मालिकेतील श्री या भूमिकेमुळे शशांक केतकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ही मालिका सुरू असतानाच या मालिकेत जान्हवीची व्यक्तिरेखा साकारणारी तेजश्री प्रधानसोबत त्याचे सूत जुळले आणि त्यांनी ही मालिका सुरू असतानाच लग्न केले. पण त्यांच्यात काहीच महिन्यात खटके उडू लागले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर देखील शशांक आणि तेजश्री होणार सून या घरची या मालिकेत काम करत होते.शशांकच्या घटस्फोटानंतर त्याच्या आयुष्यात प्रियांका ढवळे आली आणि तिने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.शशांक सोशल मीडियाचा वापर खूपच कमी करतो आणि त्यातही दरम्यानच्या काळात त्याने त्याचे व्हॉटसअॅप देखील बंद केले होते. त्यामुळे त्याचे प्रियांकासोबत बोलणे खूपच कमी झाले होते. पण या दुराव्याचा त्यांच्या नात्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचे नाते अधिकच घट्ट होत गेले. प्रियांका ही एक खूप चांगली डान्सर आहे. तिने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवलेले आहे.त्यामुळे कलेविषयी तिला प्रचंड प्रेम आहे. शशांक तिला सगळ्याच चांगली क्रिटिक मानतो. तो कोणत्या गोष्टीत चुकत असेल तर ती लगेचच त्याला सांगते. 
Web Title: Janni said about the second marriage of 'real life' .......
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.