An item song with Exculsive Solar Sunny Leone | Exculsive गष्मिरचे सनी लिओनीसोबत आयटम साँग

 बेनझीर जमादार
 
कान्हा', 'वन वे तिकीट'. 'देऊळबंद' असे एक से बढकर एक  मराठी चित्रपट देणारा अभिनेता  गष्मिर महाजनी हा लवकरच बॅालिवूडमध्ये पदापर्ण करत आहे. 'डोंगरी का राजा' असे या हिंदी सिनेमाचे नाव आहे. विशेष म्हणजे गष्मिर त्याच्या पहिल्याच बॅालिवूड सिनेमात  सनी लिओनीसोबत आयटम साँग करताना दिसणार आहे. या चित्रपटाविषयी सीएनएक्सला गष्मिर सांगतो, हिंदी सिनेमाचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे या सिनेमाच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यत पोहण्याची संधी मिळणार आहे. हिंदी किंवा मराठी सिनेमा  असा  फरक मी कधीही करत नाही. सिनेमा हा सिनेमाच असतो. आपण उगाच बॅालिवुड सिनेमा आणि मराठी सिनेमा असा फरक करत असतो. सिनेमात फक्त माझी भाषा बदलली आहे इतकाच काय तो फरक आहे. तसेच आज मराठी सिनेमादेखील बॅालिवूड सिनेमांना टक्कर देत आहेत. या हिंदी सिनेमामुळे मला एक छान अनुभव मिळाला आहे. या सिनेमात माझ्यासोबत रोनित रॅाय देखील झळकणार आहे. सनी लिओनी विषयी म्हणाल, तर सनी खरचं एक खूप छान अभिनेत्री आहे. तिच्या कामाच्या बाबतीत खूप प्रोफेशनल आहे. सनीने तिच्या मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये ठसा उमटवालाय.  

Web Title: An item song with Exculsive Solar Sunny Leone
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.