It will be like a comedy! | अशी निघणार कॉमेडीची वरात !
अशी निघणार कॉमेडीची वरात !
विनोद म्हणजे कॉमेडी कुणाला आवडत नाही? नाटक असो की सिनेमा असो किंवा अजून काहीही असो विनोद घडला कि प्रेक्षक मनमुराद हसतो आणि क्षणभरासाठी आपले सर्व दुःख विसरून जातो. असेच खळखळून हसवण्यासाठी कॅफेमराठी घेऊन येत आहे, संदीप मनोहर नवरे दिग्दर्शित “कॉमेडीची वरात” भन्नाट असा लाइव्ह शो. आठ विनोदवीरांच्या विनोदाने तुम्ही खुर्चीत गदगदून हसण्यासाठी आता सज्ज व्हा, कारण याचा शुभारंभाचा शो मंगळवार १९ जून रोजी नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वा. होणार आहे.

मराठी डिजिटल विश्वात आघाडीच्या कॅफेमराठीने कॉमेडीची वरात हा लाईव्ह शो संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण सर्व वयोगटातील मराठी प्रेक्षकांना या शोचा आनंद घेता यावा म्हणून. जुन्या कॉमेडीची गुंफण नव्या स्टँड-अप कॉमेडीसोबत करण्याचा कॅफेमराठीचा हा प्रयत्न आहे. या शो मध्ये बतावणी, कॉमेडी स्कीट, स्टँड-अप कॉमेडी सोबत कॅफेमराठीचे प्रसिध्द शो गावभर चर्चा, जी.बी.सी.न्यूज आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचा लोकप्रिय शो म्हणजे बिंदास बोल प्रथमच लाईव्ह बघायला आणि अनुभयाला मिळणार आहे. इतकेच नाही तर ज्या ज्या ठिकाणी हा शो होणार आहे, त्या त्या ठिकाणच्या स्थानिक कलाकरांना देखील यात काम करण्याची संधी कॅफेमराठी उपलब्ध करून देत आहे.

या कॉमेडीच्या वरातीत राजू जगताप, प्रवीण भाबल, प्रियंका घाग, गणेश गायकवाड, सिद्धांत माईन, हिमांगी सुर्वे या कलाकरांची वर्णी लागली आहे. स्टँड-अप कॉमेडीमध्ये ज्याने मुंबईकरांना खळखळून हसवलं असा रोहित पोळ देखील या शोचे प्रमुख आकर्षण आहे आणि कॅफे मराठीच्या बिंदास बोलचे सूत्रधार भूपेंद्रकुमार नंदन यांचा देखील विशेष सहभाग यात असणार आहे.संकल्पना निखील रायबोले, रोहित भागवत यांची आहे.  

Web Title: It will be like a comedy!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.