Interview: Like to play a challenging role: bright light! | ​Interview : आव्हानात्मक भूमिका साकारायला आवडतात : तेजस्वी प्रकाश !

-रवींद्र मोरे 
वाद-विवादात सापडल्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहाने एक मालिका काही दिवसांपूर्वी बंद करावी लागली. मात्र निर्मात्यांनी त्याच मालिकेला नवे रुप देत एक नवीन मालिका प्रदर्शित करण्याचे ठरविले आहे. काहीच दिवसानंतर ही मालिका सुरू होणार असून यात तेजस्वी प्रकाश वायंगणकरने प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या प्रवासाबद्दल तेजस्वीसोबत सीएनएक्सने मारलेल्या गप्पा...! 

* या मालिकेचे वेगळेपण काय आहे?  
- सध्याच्या युगात कोणीही दिलेला शब्दाचे पालन करत नाही. त्यामुळे नात्यात दूरावा निर्माण होतो. मात्र या मालिकेत १२ वर्षापूर्वी दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य व्यतित करते, असे दाखविण्यात आले. यात माझ्या जोडीदारावर येणाºया प्रत्येक संकंटावर मी माझ्यापरिने मात करते आणि त्याच्या आयुष्याचे संरक्षण करते. 

* तू एक मराठी अ‍ॅक्ट्रेस आहे, मात्र या मालिकेत तुझा संपूर्ण पेहराव राजस्थानी आहे, तर या कॉस्च्युमबाबत काय सांगशील? 
-  मी एक अभिनेत्री आहे, त्यामुळे भूमिकेनुसार पेहराव करावाच लागतो. त्यात मी मराठी किंवा हिंदी आहे, हे पाहावे लागत नाही. राजस्थानी कॉस्च्युमबाबत सांगायचे म्हटले तर हा पेहराव मला खूपच इंटरेस्टिंग वाटायचा. त्यात राजस्थानी लहेंगा आणि ज्वेलरीने माझी भूमिका खूपच दमदार वाटायची. 

* या मालिकेचे शूटिंग राजस्थानात झाले असून तेथील अनुभव कसा वाटला?
- या दिवसातही तिथे खूपच गरम व्हायचे. मात्र याचा काहीही त्रास न होता आम्ही सर्वांनी शूटिंग खूप एन्जॉय केली. शूटिंगदरम्यानच्या या मौजमजेमुळेच गरम वातावरण असूनही त्याचा त्रास जाणवला नाही.

* या मालिकेमधील अभिनेता रोहित सुचांतीसोबतची केमिस्ट्री कशी वाटली?
- रोहितसोबत काम करण्याचा खूपच चांगला अनुभव आला. त्याचे परफॉर्मस्देखील खूप चांगले होते. विशेष म्हणजे मालिकेत जर नायकाची भूमिका दमदार असेल तर अभिनय करण्यात अजून मजा येते. रोहितने यात खूपच चांगला अभिनय केला असून त्याच्याकडूनही मला अभिनयाचे काही धडे शिकायला मिळाले. 

* मालिकेच्या ट्रेलरमध्ये तू अभिनेत्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारताना दिसते, तुला पाण्याची भीती वाटली नाही का?
- मला स्वीमिंग करायला खूपच आवडते आणि मी लहानपणापासूनच स्वीमिंग करत आहे. त्यामुळे पाण्याची भीती तर वाटली नाही, मात्र उंचावरून उडी मारताना खूपच घाबरली होती. शिवाय ज्याठिकाणी पाण्यात उडी मारायची होती तो काय स्वीमिंगपूल नव्हता, त्याठिकाणी खूपच गाळ होता, शिवाय परिधान केलेला लहेंगा हा खूपच जड होता आणि पाण्यात उडी मारल्याने पाण्याने तो पुन्हा अजून जड झाला. त्यातच ज्वेलरीदेखील होते. हे एक आव्हानात्मक सीन होते, मात्र अशा आव्हानात्मक भूमिका साकारला मला आवर्जून आवडतात. 

* मालिकेत तू उंटावर सफर करताना दिसत आहे, हा अनुभव कसा होता?
- याप्रसंगी मी आयुष्यात पहिल्यांदाज उंटावर बसली. हा अनुभव तसा खूपच मजेदार मात्र थोडी भीतीदेखील वाटत होती. कारण उंट खूप उंच होता आणि त्याची मानसिक स्थिती जर बिघडली तर माझे काय होईल ही भीतीनेहमी सतावत होती. मात्र सुदैवाने तसे काही झाले नाही. 
Web Title: Interview: Like to play a challenging role: bright light!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.