If you take the drama of the play, the discount will be given on the ticket of Dhai Akshar Prem Ke | ​या नाटकाचे कात्रण घेऊन गेल्यास ढाई अक्षर प्रेम के या नाटकाच्या तिकिटावर मिळणार सवलत

नाटकाच्या, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नेहमीच काही ना काही युक्त्या वापरल्या जातात. ढाई अक्षर प्रेम के नाटकाच्या टीमने देखील अशीच एक छानशी युक्ती वापरली आहे. व. पु. काळे यांच्या कादंबरीवर आधारित हे नाटक असणार असून या नाटकांचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर करणार आहे. नाटक दिग्दर्शित करण्याची दिग्पालची ही पहिलीच वेळ आहे. या नाटकाचे नेपथ्य प्रसाद वालावलकर करणार असून या नाटकाला पार्श्वसंगीत नुपूरा निफाडकर यांनी दिले आह तर वेशभूषा पोर्णिमा ओक यांची आहे. या नाटकाची निर्माती अभिनेत्री मुक्ता बर्वे आहे. मुक्तासोबत सुजाता मराठे या नाटकाची निर्मिती करत आहेत. मुक्ताने याआधी कोड मंत्र या नाटकाची निर्मिती केली होती. 
कोडमंत्र आणि ढाई अक्षर प्रेम के या दोन्ही नाटकांची निर्मिती ही मुक्ताचीच असल्याने मुक्ताने तिच्या नव्या नाटकाच्या प्रमोशनसाठी जुन्या नाटकाचा वापर केला आहे. कोडमंत्र हे नाटक रंगभूमीवर दाखल होऊन अनेक महिने झाले आहे. या नाटकाला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे. या नाटकाचे कथानक, सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या नाटकाने अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत. या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या नाटकाप्रमाणेच ढाई अक्षर प्रेम के या नाटकावर देखील प्रेक्षक प्रेम करतील अशी या नाटकाच्या टीमला खात्री आहे. 

codemantra

ढाई अक्षर प्रेम के हे नाटक पाहायला जात असताना कोडमंत्र या गाजलेल्या नाटकाच्या जाहिरातीचे कात्रण घेऊन गेल्यास ढाई अक्षर प्रेम केच्या तिकिटावर प्रेक्षकांना १० टक्के सवलत मिळणार आहे. ढाई अक्षर प्रेम के या नाटकात अजय पूरकर प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर या नाटकाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर करत आहे. दिग्पाल हा एक अभिनेता असून त्याने सखी, अस्मिता यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. फर्जंद या त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटाचा पोस्टर प्रेक्षकांच्या नुकत्याच भेटीस आला असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Web Title: If you take the drama of the play, the discount will be given on the ticket of Dhai Akshar Prem Ke
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.