Identify who is the famous Marathi actress? | ​ओळखा पाहू कोण आहे ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री?

रेणुका शहाणेने सूनबाईचा भाऊ, रिटा यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच सर्कस, इम्तिहान, सैलाब यांसारख्या मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच हम आपके है कौन, मासूम यांसारख्या हिंदी चित्रपटातही त्याने काम केले आहे. हम आपके है कौन या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे तर प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर आपली देखील सून अशीच असावी असे अनेक सासवांना वाटायला लागले होते. 
रेणुकाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही मराठी इंडस्ट्रीमधून केले आहे. रेणुकाचा नुकताच म्हणजेच ७ ऑक्टोबरला वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर तिला अनेकांनी विश केले. तिच्या या वाढदिवसाला तिने तिच्या चाहत्यांना एक खूप चांगले रिटर्न गिफ्ट दिले आहे. तिने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचा आताचा आणि लहानपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही असे कॅप्शन रेणुकाने लिहिले आहे.

renuka shahane


रेणुकाने पोस्ट केलेल्या या फोटोत अंगठा चोखणारी चिमुकली रेणुका आपल्याला पाहायला मिळत आहे. रेणुकाच्या या फोटोवर पाच हजाराहून अधिक लोकांनी लाइक केले असून अनेकांनी या फोटोवर कमेंट केले आहे. तसेच हा फोटो अनेकांनी शेअर देखील केला आहे. 
रेणुका शहाणेने आज मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ती तिच्या भूमिका खूप चोखंदळपणे निवडत आहे. रेणुकाचे अभिनेता आशुतोष राणासोबत लग्न झाले असून त्यांना दोन मुले आहेत. ती सध्या तिचा जास्तीत जास्त वेळ हा मुलांना देते. दोन-तीन वर्षांपूर्वी ती हायवे या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. 
रेणुका चित्रपटात खूप कमी काम करत असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहाते. त्यामुळे सोशल नेटवर्किंगवर तिला अनेक जण फॉलो करतात. 

Also Read : 20 साल बाद, आयेगा सैलाब..... एकत्र येणार सचिन-रेणुका ?
Web Title: Identify who is the famous Marathi actress?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.