स्मिता गोंदकरचा या लूकला किती लाईक्स देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 07:15 AM2019-03-19T07:15:00+5:302019-03-19T07:15:00+5:30

सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

How many likes You will Give To Smita Gondkar For this Photoshoot | स्मिता गोंदकरचा या लूकला किती लाईक्स देणार?

स्मिता गोंदकरचा या लूकला किती लाईक्स देणार?

googlenewsNext

दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या स्मिताने आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाज या फोटोशूटच्या माध्यमातून रसिकांसमोर आणला आहे. ती नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्मिताचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.

'पप्पी दे पारुला' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत स्मिताने सा-यांची मनं जिकंली आहेत. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे स्मिताचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Web Title: How many likes You will Give To Smita Gondkar For this Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.