How did you think of the process of planting Radka Sunil? | रसिका सुनीलचा हा लावणी करतानाचा अंदाज तुम्हाला कसा वाटला?

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत शनाया या भूमिकेमुळे तिने रसिकांची मनं जिंकली आहे.तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या ग्लॅमरस लूकचेही चाहते दिवाने आहेत.मालिकेत शनायाच्या भूमिका साकारणारी  रसिका ऑनस्क्रीनही वेस्टर्न आऊटफिटमध्ये पाहायला मिळतेय.मात्र तुम्हाला माहिती आहे का मालिकेत झळकण्यापूर्वी रसिकांने पोस्टर गर्ल या मराठी सिनेमात झळकली होती.कशाला लावतो नाट या गाण्यावर तिने अस्सल मराठमोळ्या अंदाजात लावणी करताना ती थिरकली होती. पोस्टर गर्ल सिनेमातले हे गाणे हे खूप लोकप्रिय ठरले.आणि याच गाण्यामुळे तिच्या करिअरला नवीन वळण मिळाले. पोस्टर गर्ल गाण्यात लावणीवर थिरकलेली रसिकाला पाहताच सारेच आश्चर्यचकीत होतात.मालिकेत धड  मराठीही न  बोलणारी शनाया सिनेमात मात्र लावणी करताना दिसते तेव्हा सा-यांनाच एक सुखद धक्का बसतो. लावणी करतानाचा तिचा हा लूकचीही चांगलीच भुरळ पडल्याचे पाहायला मिळते.रूपेरी पडद्यावर झळकलेल्या रसिका सुनील त्यावेळी लोकप्रिय नव्हती.मात्र हे गाणेच तिच्यासाठी टर्निंग पाईंट ठरला आणि शनाया बनत तिने छोट्या पडद्या माझ्या नव-याची बायको मालिकेत एंट्री घतेली. मालिकेत ग्लॅमरस अंदाजात दिसणारी शनायाचे आज खूप चाहते आहेत.तिची प्रत्येक अदा पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोव्हर्सही आहेत. तिच्या प्रत्येक फोटो पाहून तिचे चाहते तिला अनेक लाईक्स आणि कमेंटस देताना दिसतात.  चाहत्यांना घायाळ करण्यासाठी केवळ हॉट लूकच गरजेचा असतो असे नाही.आपल्या सोज्वळ सौंदर्य आणि अभिनयामुळेही चाहत्यांची मनं जिंकु शकतो हेच रसिकाच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे.    


शनाया म्हणजे रसिकाच्या मालिकेतील कारनाम्यांमुळे तिच्या रिअल लाइफमध्ये काय सुरु असते हे जाणून घेण्याचीही रसिकांना तितकीच उत्सुकता असते. नुकतंच शनाया म्हणजेच रसिका हिनं नवी कोरी कार खरेदी केली. त्या कारचा फोटो तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. तिच्या या पोस्टला रसिकांचा भरभरुन प्रतिसाद लाभला.सध्या सोशल मीडियावर तिच्या या लावणी अंदाजातल्या फोटोलाही खूप पसंती मिळत असल्यामुळे ग्लॅमर दुनियेत कलाकारांना त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलही खूप महत्त्वाची असते.ब-याचदा अभिनेत्री स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी वेस्टर्न लूक असलेले ड्रेसिंग करत असल्याचे पाहायला मिळतं.मात्र रसिका सुनील  या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
Web Title: How did you think of the process of planting Radka Sunil?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.