Housefull premiere of 'Purki' movie! Have you seen? | 'फिरकी' चित्रपटाचा हाऊसफुल्ल प्रीमियर! तुम्ही पाहिलात का ?

अनेक चांगल्या कलाकृतींना प्रेक्षकांनी नेहमीच उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फिरकी’ या चित्रपटालाही मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे.या सिनेमाचा भव्य प्रिमीअर शो नुकताच संपन्न झाला.सिनेमातील स्टारकास्टसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.वेगळ्या विषयाच्या चित्रपट निर्मितीबद्दल मान्यवरांनी निमार्ता-दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक केले.लहानांसोबत मोठ्यांनाही हा सिनेमा चांगलाच भावतोय.आयुष्याच्या वाटेवर दिशादर्शक ठरणारा महत्त्वाचा वाटसरु म्हणजे मित्र.'फिरकी' चित्रपटात गोविंद व त्याचे दोन मित्र बंड्या व टिचक्या यांच्या निखळ मैत्रीची कथा उलगडण्यात आली आहे.गोविंदला असलेला पतंगाचा नाद आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोडी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी चांगल्या पद्धतीने दाखवल्याने एक उत्कृष्ट चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाल्याच्या भावना अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.मैत्रीचे नाते अधोरेखित करताना नात्यांचे वेगवेगळे कंगोरे मांडण्याचा प्रयत्न ‘फिरकी’ मधून झाला आहे.मौलिक देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन व दिग्दर्शन सुनिकेत गांधी यांचे आहे.‘फिरकी’ चित्रपटात पार्थ भालेराव,पुष्कर लोणारकर,अभिषेक भाराटे,अथर्व उपासनी, अथर्व शाळीग्राम या बालकलाकारांसोबत हृषिकेश जोशी,ज्योती सुभाष,अश्विनी गिरी,किशोर चौघुले या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.
‘इफ्फी’ चित्रपट महोत्सवात ‘फिरकी’ चित्रपटाची झलक पाहिल्यानंतर बॉलिवूडच्या प्रकाश झा,सतीश कौशिक,रमेश सिप्पी, आनंद राय यासारख्या अनेक मान्यवरांनीसुद्धा ‘फिरकी’ चे कौतुक करत चित्रपटाला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.मान्यवरांनी गौरविलेला ‘फिरकी’ चित्रपट अवश्य पहा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.


'भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमात बालवयातच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालनारा पार्थ भालेराव बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा एका संवेदनशील भूमिकेत दिसणार आहे.अल्पावधित लोकप्रिय झालेल्या पार्थने 'फिरकी' या आगामी मराठी सिनेमात एका निरागस मुलांची व्यक्तिरेखा साकारली आहे. स्पॅाटलाईट प्रोडक्शनच्या ‘फिरकी' या सिनेमात दिग्दर्शक सुनिकेत गांधी यांनी पतंग आणि फिरकीच्या माध्यमातून लहानगयांच्या भावविश्वात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. 
Web Title: Housefull premiere of 'Purki' movie! Have you seen?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.