Hot-clicking on Bikini Look photos shared with the beach | बीचवर क्लिक केले बिकनी लूक फोटो शेअर करताच रंगल्या खुमासदार चर्चा

मराठी-हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये नेहा जोशीनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.पोश्टर गर्ल, पोश्टर बॉईज, जब लव्ह हुआ, सॅटर्डे सॅटर्डे  बघतोस काय मुजरा कर या मराठी-हिंदी सिनेमात काम केलं आहे. याशिवाय का रे दुरावा, ऊन पाऊस मालिकेतही नेहा जोशीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.छोट्या पडद्यावर 'आवाज  या सिरीजमधील जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मालिकेत सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारल्यानंतर मोठ्या पडद्यावर लक्ष्मीबाई टिळक साकारण्याची इच्छा असल्याचे नेहाने सिएनएक्समस्तीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.याशिवाय हिंदीत मकरंद देशपांडेनेदिग्दर्शित केलेलं 'जोक' आणि धर्मवीर भारती यांच्या कवितावर आधारित 'कनुप्रिया' ही दोन नाटकंही नेहाने केली आहेत याशिवाय मराठी रंगभूमीवर 'वाडा चिरेबंदी' नाटकातल्या नेहाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.आता नेहा चर्चेत असण्याचा एक खास कारण आहे. 

नेहमीच बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टीतील आपल्या नायिका.जेव्हा काही करतात तेव्हा धुमाकुळ झालाच समजा.असाच काहीशी खुमासदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.कारण यावेळी नेहा जोशीने पुन्हा एकदा फोटोशूट करत सा-यांचेच लक्षवेधुन घेतले आहे.मात्र यावेळी या  नेहाने केलेले फोटोशूट जरा वेगळे आहे. ते म्हणजे तिने पहिल्यांदाच बिकीनी घालत खास फोटोशूट केले आहे.बिकनी लूकमधला  फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तिला खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत.नेहमीच नेहा जोशी  तिचे हटेक आणि बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.मध्यंतरी तिने टॉपलेस फोटोही शेअर केला होता.विशेष म्हणजे इंटरनेटवर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात बघितलेही जात आहेत.त्यामुळे नेहा जोशीच्या या बिकनी अंदाजचीही फोटोशूटचीही जोरदार आणि तितकीच खुमासदार चर्चा सुरु आहे.या फोटोशूटमध्ये नेहा जोशीच्या विविध छबी पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये नेहाचा अंदाज ग्लॅमरस आहे.नेहाने टिपलेली नेहा जोशीची प्रत्येक छबी विशेष आणि हटके आहे.
Web Title: Hot-clicking on Bikini Look photos shared with the beach
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.