A Hollywood cinema change in the career of this Maratha actress, who is the actress? | एका हॉलीवुड सिनेमामुळे या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या करिअरमध्ये आला बदल,कोण आहे ती अभिनेत्री ?

'सांगतो ऐका या सिनेमातून मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने मराठी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. या आधी पिंजरा या छोट्या पडद्यावरील मालिकेतील आपल्या अभिनयामुळे संस्कृती घराघरातील रसिकांची लाडकी बनली होती. आपल्या पहिल्याच सिनेमातून संस्कृतीने रसिकांची मने जिंकली. पहिल्याच सिनेमात प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्यासह स्क्रीन शेअर करत ब-याच गोष्टी शिकण्याची संधी संस्कृतीला लाभली. यानंतर विविध सिनेमात संस्कृतीने भूमिका साकारल्या. मात्र सिनेमा स्वीकारताना ती फार सिलेक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळते. मात्र हीच संस्कृती सुरुवातीला अभिनय क्षेत्रात करियर करण्याबाबत फारशी गंभीर नव्हती. त्याचवेळी अभिनेत्री सुमुखी पेंडसेने संस्कृतीला एक सल्ला दिला. तिने संस्कृतीला THE DEVILS WEARS PRADA हा हॉलीवुडचा सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला.त्यानुसार संस्कृतीने हा सिनेमा पाहिला. हा हॉलीवुडचा सिनेमा पाहून आपल्यात बदल घडल्याची कबुली खुद्द संस्कृतीने दिली आहे. सांगतो ऐका या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.येत्या काही दिवसांत 'दिल-दिमाग-बत्ती', 'लग्न मुबारक' आणि 'बेभान' असे सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत. मिलिंद शिंदे दिग्दर्शित सिनेमातही ती काम करणार असून त्याचं शीर्षक अद्याप ठरलेले नाही. आगामी काळात भारंभार सिनेमा स्वीकारायचे नसून सिलेक्टिव्ह राहण्याचा संस्कृतीने निर्धार केला आहे.सिनेमा स्वीकारताना पटकथा आणि सहकलाकारांना ती महत्त्व देते. स्वभावाशी सुसंगत सहकलाकार असतील तर चित्रीकरण रंगते आणि सेटवर चांगलं वातावरण राहतं असं संस्कृतीला वाटतं. आगामी काळात बरंच काही शिकायचं असल्याचेही संस्कृतीने म्हटले आहे.तिच्या या दृष्टीकोनात बदल घडला आहे ते एका हॉलीवुडच्या सिनेमामुळे.आयुष्यात प्रत्येक व्यक्तीसाठी काही महत्वाची गोष्ट असते.ती गोष्ट त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. ते त्याच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.अशीच एक गोष्ट अभिनेत्री संस्कृती बालगुडेसाठी महत्वाची असल्याचे तिने सोशलमीडियावर सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच संस्कृतीने डान्सची स्टेप करतानाचा एक फोटो अपलोड केला होता.त्याचबरोबर तिने एक पोस्टदेखील अपडेट केले होते. आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले होते की,  माझ्यासाठी डान्स हे जीवन आहे.माझ्या प्रत्येक श्वास हा डान्स आहे.त्याचबरोबर डान्स माझ्यासाठी ताकद आहे. डान्स मला एक प्रकारचा आनंद देत असल्याचेदेखील तिने सोशलमीडियावर सांगितले होते.
Web Title: A Hollywood cinema change in the career of this Maratha actress, who is the actress?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.