Hitting the centennial by centrally doing the centenary of Maharashtra | ​महाराष्ट्राला सेंटी करणारा शेंटिमेंटल ठरतोय हिट

"सिनिअर दिसले की जीना चढल्यासारखे चढायचे एवढेच येते का हो तुम्हाला" किंवा "कीप इट अप" असे शेंटिमेंटल या चित्रपटातील विविध संवाद सध्या महाराष्ट्रभर गाजत आहेत. समीर पाटील यांची खुसखुशीत संवाद असलेली संहिता आणि अचूक दिग्दर्शन, अशोक सराफ यांचे विनोदाचे भन्नाट टायमिंग, उपेंद्र लिमये यांचा कुल डूड अॅटिट्युड आणि त्यांना लाभलेली विकास पाटील, सुयोग गोऱ्हे, पल्लवी पाटील आणि रमेश वाणी आदी सहकलाकारांची साथ हे या चित्रपटाच्या यशामागचे गमक आहे.
पोलिसांबद्दल बोलताना आपल्याकडे नेहमी त्यांच्या उशिरा येण्यावरून, सुटलेल्या पोटावरून उपहासात्मक पद्धतीने बोलले जाते किंवा त्यांना भ्रष्टाचारी समजले जाते. परंतु त्यांच्या वर्दीच्या आतमध्ये आपल्याच सारखा घरादाराची काळजी असणारा हाडामासाचा संवेदनशील माणूस आहे हे आपण विसरून जातो. याच माणसाचा वेध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. हे सगळे वर्णन ऐकले की, हा एखादा गंभीर चित्रपट असेल असे वाटते. परंतु खुसखुशीत संवादांमुळे अतिशय खुमासदार असा हा चित्रपट आहे. या चित्रपटातील पोलिसांचा संसार कामाच्या अनियमित वेळांमुळे पोलिस चौकीशीच कसा बांधला गेलेला असतो याचे चित्रण करणारे झंकार हे गाणे तर सध्या विशेष गाजते आहे.
अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके यांच्या ई.सी.एम. पिक्चर द्वारे निर्मित आर.आर.पी. कॉर्पोरेशन, बनी डालमिया प्रस्तुत शेंटिमेंटल हा चित्रपट सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 
शेंटिमेंटल या चित्रपटात बॉलिवूडमधील रघुवीर यादव देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण बिहारमध्ये करण्यात आले आहे. 

Also Read : तुम्हाला माहीत आहे का चित्रपटसृष्टीत येण्याआधी बँकेत काम करायचे अशोक सराफ?
Web Title: Hitting the centennial by centrally doing the centenary of Maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.