Hindi actor Akshay Mhatre will appear for the first time in Marathi | हिंदीतील लोकप्रिय अभिनेता अक्षय म्हात्रे पहिल्यांदाच दिसणार मराठीत

अक्षय म्हात्रे आणि मधुरा नाईक या मराठी कलाकारांची ओळख देशभरात आहे. पण हिंदी मालिकांमुळे. या दोघांनाही हिंदी मालिकेमुळे घराघरात ओळखलं जातं. ‘लूज कंट्रोल’च्या माध्यमातून दोघेही पहिल्यांदाच मराठी रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात तो एका कॉलेज युवकाची भूमिका साकारत आहे.  दोघांचाही हा पहिलाच सिनेमा असल्याने त्यांच्या कामांचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अक्षय हा हिंदीतील लोकप्रिय ‘पिया अलबेला’ या मालिकेत काम करतो तर मधुराने अनेक मालिकांमध्ये कामे केली आहेत. त्यात ‘कहाणी घर घर की’, ‘उतरन’, ‘संगम’, ‘नागिन’ अशा अनेक मालिकांचा समावेश आहे. दोघांचाही हा पहिला मराठी सिनेमा असल्याने त्यांनाही प्रेक्षकांच्या प्रतिसादाची उत्सुकता आहे. तर आता दोघेही हिंदीनंतर मराठी मनोरंजन विश्वात काय धमाल करतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. 

‘लूज कंट्रोल’ या चित्रपटाची निर्मिती अजित साटम, रियाझ इनामदार, साकीब शेख ,जिग्नेश पटेल, मिहीर भट यांनी या निर्मिती केली आहे. इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या तीन मित्रांची ही कथा असून रोजच्या जगण्यातील कथानक यातून मांडण्यात आलं आहे. कॉलेजमध्ये अभ्यास करायच्या दिवसांमध्ये या तिघांनी काय काय करामती केल्या आणि पुढे ते कोणकोणत्या पेचात सापडले हे अतिशय विनोदी धाटणीमध्ये अजय सिंह यांनी लिहिलेल्या कथेतून व प्रियदर्शन जाधव यांनी लिहिलेल्या संवादांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

अक्षय म्हात्रेने सावर रे या मराठी मालिकेत तर युथ या मराठी चित्रपटात काम केले होते. अक्षय म्हात्रेने पिया अलबेला या मालिकेत नरेन नावाची भूमिका साकारली होती. ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे.  खूपच कमी वेळात या मालिकेतील नरेन आणि पूजा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती.
Web Title: Hindi actor Akshay Mhatre will appear for the first time in Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.