This is the heroine who will be seen in the film Ashikee opposite the acting debut | अशी ही आशिकी या चित्रपटात अभिनय बेर्डेसोबत झळकणार ही नायिका

ती सध्या काय करते या चित्रपटाद्वारे अभिनय बेर्डेने मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री केली. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो मुलगा असल्याने त्याच्या पदार्पणापूर्वीच त्याच्या नावाची चर्चा झाली होती. त्याच्याकडून प्रेक्षकांच्या खूप साऱ्या अपेक्षा होत्या. ती सध्या काय करते या चित्रपटाद्वारे त्याने तो एक चांगला अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे तो आता कोणत्या चित्रपटात झळकणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. त्याच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा काहीच महिन्यांपूर्वी करण्यात आली. आता तो अशी ही आशिकी या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती सचिन पिळगांवकर करणार आहेत. 
सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध जोडी होती. सचिन पिळगांवकर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना लक्ष्मीकांत यांना पाहायला मिळाले होते. अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्या दोघांनी एकत्र काम देखील केले होते. सचिन यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आता सचिन लक्ष्मीकांत यांच्या मुलासोबत काम करणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. सचिन पिळगावकर यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात अभिनयसोबत कोणती नायिका झळकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. या चित्रपटासाठी एखाद्या नव्या चेहऱ्याच्या शोधात चित्रपटाची टीम होती. आता चित्रपटाच्या टीमला एक नवा चेहरा मिळाला असून हेमल इंगळे असे या अभिनेत्रीचे नाव आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
अभिनयने ती सध्या काय करते या त्याच्या पहिल्याच चित्रपटाद्वारे चांगलेच फॅन फॉलॉविंग मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या अशी ही आशिकी या चित्रपटाची त्याच्या फॅन्सना चांगलीच उत्सुकता लागली असणार यात काही शंकाच नाही. 

ashi hi aashiqui cast

Also Read : ​अशी ही आशिकी या चित्रपटाद्वारे सचिन पिळगांवकर करणार नव्या क्षेत्रात पदार्पण
Web Title: This is the heroine who will be seen in the film Ashikee opposite the acting debut
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.