Hemangi poet says, I am a poet | ​हेमांगी कवी म्हणतेय, कवी हूँ मैं

हेमांगी कवीने फक्त लढ म्हणा, डावपेच, कोण आहे रे तिकडे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ठष्ट, ती फुलराणी या नाटकांमधील तिच्या भूमिकेचे तर खूपच कौतुक झाले आहे. हेमांगी कवी ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली कवियत्री आहे असे तुम्हाला सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसेल का? हो, पण हे खरे आहे. हेमांगी एक चांगली कवियत्री असून ती नेहमीच तिच्या फेसबुकच्या अकाऊंटवर कविता पोस्ट करत असते आणि तिच्या या कवितांचे कौतुक तिच्या फॅन्सकडून देखील केले जाते. 
हेमांगीच्या अधिकाधिक कविता या हिंदीत असतात. तिने नुकतीच एक हिंदी कविता तिच्या अकाऊंटला पोस्ट केली असून या कवितेला तिच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिच्या या कवितेला खूप लाइक्स मिळाले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
हेमांगी कवी तिच्या प्रत्येक कवितांसोबत हेमांगी कवी आणि कवी हूँ मैं असे हॅश टॅग देत आहे. हेमांगीच्या नावातच कवी हा शब्द आहे. त्यामुळे ती कविता लिहित असल्याने स्वतःला कवी असे म्हणत आहे की तिच्या नावामुळे मैं हूँ कवी असे लिहित आहे हे केवळ तीच आपल्याला सांगू शकते. पण हेमांगी कवियत्री बनली असल्याचा तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद होत आहे. हेमांगीच्या या कविता वाचल्यास ती एक खरेच चांगली कवियत्री असल्याचे आपल्या लक्षात येते. त्यामुळे भविष्यात हेमांगीने एखाद्या चित्रपटात गीत लिहिले तर तिच्या फॅन्सना नक्कीच नवल वाटणार नाही. 

Also Read : ती फुलराणी या नाटकाचे 100 प्रयोग लवकरच
Web Title: Hemangi poet says, I am a poet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.