Head And legs upside down, do u know who is this actress? | खाली डोकं वर पाय… या फोटोतील कोण आहे ही मराठमोळी अभिनेत्री?
खाली डोकं वर पाय… या फोटोतील कोण आहे ही मराठमोळी अभिनेत्री?

कलाकार मंडळींचं शेड्युअल खूप बिझी असतं. त्यात मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं शुटिंग तर कधीकधी सकाळपासून दुसऱ्या दिवसापर्यंत चालतं. अशा या बिझी शेड्युअलमध्ये कलाकारांना स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक असतं. त्यामुळे काही कलाकार फिट राहण्यासाठी वर्कआऊट करत जिममध्ये घाम गाळतात. तर काही कलाकार विविध योगासनं करतात. फिटनेसबाबत सजग असलेली अशीच एक अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी सायली फिटनेसवर बरंच लक्ष देते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते.

योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. असंच एक आसन करतानाचा सायलीचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत तिचे खाली डोकं वर पाय केलेत. याचाच अर्थ ती शीर्षासन करत असतानाचा पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोला बरेच लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. 


छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.आता मराठी मालिकेनंतर ती सायली राजस्थानच्या पार्श्वभूमीवर घडणारी परफेक्ट पती या मालिकेत झळकत आहे. ही मालिका एका तरुण आणि स्वतंत्र मुलीची कथा आहे. विधिता रजावतची भूमिकेत सायली झळकत असून ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा आईच्या भूमिका साकारत आहे. 

आजवर रसिकांनी तिला अशा भूमिकेत पाहिलेलं नाही. आकर्षक, सकारात्मक आणि तिच्या गावातील सगळ्यात जास्त शिकलेली विधिता अनाथ आहे. तिची बहिण आणि भाऊजी यांनीच तिला लहानाचं मोठं केलंय.परफेक्ट पतीमध्ये सहभागी होण्याबद्दल सायली म्हणाली, "परफेक्ट पतीमध्ये विधिताची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी फारच भाग्याची गोष्ट आहे. 


Web Title: Head And legs upside down, do u know who is this actress?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.