Have you seen the photograph of the son of the Mahasen? | ​गश्मीर महाजनीच्या मुलाचा फोटो तुम्ही पाहिलात का?

गश्मीर महाजनीला अभिनयाचा वारसा हा त्याच्या वडिलांकडून मिळाला. गश्मीर प्रसिद्ध अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे. गश्मीर हा चांगला अभिनेता असण्यासोबतच तो खूप चांगला डान्सर देखील आहे. त्याची स्वतःची डान्सिंग स्कूल आहे. गश्मीरने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात मुस्कुराके देख जरा या हिंदी चित्रपटापासून केली. पण त्याच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद न मिळाल्याने तो नाटकांकडे वळला. त्याने चार वर्षं पृथ्वी थिएटरमधील नाटकांमध्ये अभिनय केला. तसेच काही मराठी नाटकांचे दिग्दर्शन केले.
कॅरी ऑन मराठा या चित्रपटाद्वारे तो मराठी चित्रपटाकडे वळला. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तो देऊळबंद या चित्रपटात झळकला. 
गश्मीरची गणना आज मराठीतील हँडसम अभिनेत्यांमध्ये केली जाते. गश्मीरचे लग्न झाले असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. त्याच्या पत्नीचे नाव गौरी असून तिने एमबीए केले आहे.
गश्मीरने फादर्स डेच्या निमित्ताने त्याचा आणि त्याच्या मुलाचा एक फोटो फेसबुक या सोशल नेटवर्किंगला शेअर केला आहे. या फोटोत त्याने त्याच्या मुलाला खांद्यावर घेतले आहे. त्यासोबतच त्याने एक खूप छान पोस्ट लिहिली आहे. तुझ्यासोबत वेळ घालवताना मला पितृत्वाचे महत्त्व आणि त्याच्यातील खरे सौंदर्य कळते. या फोटोला अनेक लाइक्स मिळाल्या असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

gashmeer mahajani

गश्मिरने मुलाचा फोटो पोस्ट केल्यामुळे रविंद्र महाजनी यांची तिसरी पिढी पाहायला मिळत असल्याचा सगळ्यांना आनंद झाला आहे. पण पोस्ट केलेल्या फोटोमधली खरी गंमत म्हणजे त्याने ज्या मुलासोबत फोटो पोस्ट केला आहे तो त्याचा खरा मुलगा नसून तो त्याचा ऑनस्क्रीन मुलगा आहे. मला काहीच प्रोब्लेम नाही या त्याच्या आगामी चित्रपटात स्पृहा जोशी आणि त्याची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटातील त्याच्या मुलाचा फोटो त्याने पोस्ट केला आहे.
गश्मीरचे लग्न झाले असले तरी अद्याप त्याला मूलबाळ नाहीये.  


Must read : गश्मिर महाजनी द डान्सगुरू
Web Title: Have you seen the photograph of the son of the Mahasen?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.