Have you seen this painful act of Prajakta Mali? | अभिनेत्री प्राजक्ता माळीचा हा घायाळ करणारा अंदाज तुम्ही पाहिलाय का?

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अभिनयामुळे लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.आपला अभिनय आणि खट्याळ भूमिका यामुळे प्राजक्ता रसिकांची लाडकी आहे. मात्र प्राजक्ताचा सध्या कधीही न पाहिलेला लूक चर्चेचा विषय ठरला आहे प्राजक्ताचा हा अंदाज तुम्हालाही थक्क करेल. ही नक्की प्राजक्ताच आहे का असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. मोकळे सोडलेले केस, हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज कुणालाही घायाळ करेल. काळ्या रंगाच्या आकर्षक स्लीव्हलेस टॉपमुळे प्राजक्ताची अदा मादक आणि तितकीच कातिलाना आहे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्राजक्ताला आजवर रसिकांनी विविध मालिकांमधून वेगवेगळ्या रुपात पाहिलं आहे. कधी ड्रेसवर, तर कधी साडी परिधान करुन प्राजक्ताने रसिकाची मनं जिंकली आहेत. मात्र प्राजक्ता इतका हॉट आणि सेक्सी अंदाज रसिकांनी आजवर कधीही पाहिला नव्हता. सोशल मीडियावर सध्या प्राजक्ताचा हा सेक्सी लूक चर्चेचा विषय ठरला आहे. प्राजक्ता माळी साध्या आणि पारंपरिक अंदाजात जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाज रसिकांना पसंत पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.'जुळुन येतील रेशीमगाठी' या मालिकेतून प्राजक्ता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती.या मालिकेनंतर प्रेक्षक पुन्हा तिला पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळेच 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' मालिकेने प्रेक्षकांची  प्राजक्ताला पुन्हा ऑनस्क्रीन पाहण्याची इच्छा पूर्ण केली. मालिकेतला प्राजक्ताचा अंदाज रसिकांच्या पसंतीस पडत आहे.मालिकेतल्या तिच्या अभिनयामुळे तिच्या तिचा चाहत्यावर्गातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्राजक्ताने यापूर्वी सुवासिनी, बंध रेशमाचे, गाणे तुमचे आमचे, सुगरण अशा अनेक मालिका केल्या आहेत. तसेच तिने खो खो, संघर्ष, गोळाबेरीज असे अनेक मराठी चित्रपटदेखील केले आहेत. आगामी काळातही प्राजक्ता रूपेरी पडद्यावर झळकणार असल्यामुळे प्रजक्ताकडून रसिकांसाठी मनोरंजनाची ट्रीट मिळणार हे मात्र नक्की. 
Web Title: Have you seen this painful act of Prajakta Mali?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.