Have you seen the love of Deepika Bachi? | दीप्तीचे बाईक प्रेम तुम्ही पाहिले आहे का?

कलाकार मंडळी आपल्या भूमिकांमध्ये परफेक्शन आणण्यासाठी झटत असतात. कुणी मार्शल आर्टचे धडे घेते तर कुणी तलवारबाजीचे. काही सेलिब्रिटी तर घोडेस्वारीचे किंवा काही सेलिब्रिटी अन्य कोणत्या खास गोष्टीचे प्रशिक्षण घेताना आपण पाहिलं आहे. कलाकारांच्या ना-ना त-हा आजवर आपण रुपेरी पडद्यावर, छोट्या पडद्यावर किंवा रंगभूमीवर रसिकांना पाहिल्या आहेत. रितसर प्रशिक्षण घेतल्यानंतर कलाकारांचा हा अंदाज रसिकांना चांगलाच भावला असल्याचे दिसून आलं आहे. आता अभिनेत्री दीप्ती देवीचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दीप्तीचा रॉकिंग अंदाज पाहायला मिळत आहे. बाईकवर बसलेल्या दीप्तीचा रफ एंड टफ अंदाज या फोटोत पाहायला मिळत आहे. बुलेटवर जीन्स, शर्ट, खुले सोडलेले केस अशा ग्लॅमरस अंदाजातील दीप्तीचा रॉकिंग अंदाज रसिकांना चांगलाच भावतो आहे. सोशल मीडियावर दीप्तीच्या या फोटोला रसिकांकडून भरभरुन लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत. या फोटोसह दीप्तीनं आकर्षक आणि विचार करायला लावणारं कॅप्शनही दिलं आहे. "लोक बदलतात, तुमच्या आयुष्यात तुम्हाला नको असलेली एखादी गोष्ट घडते, मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनप्रवास हा सुरुच राहतो" असं तिचं कॅप्शनसुद्धा लक्षवेधी ठरत आहेत.आता फोटो पाहून साहजिकच दीप्तीचा हा नवा सिनेमा आहे की काय असा प्रश्न कुणालाही पडेल. दीप्तीच्या आगामी सिनेमातील भूमिकेचा हा लूक तर नाही ना अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. मात्र या फोटोमुळे दीप्तीचे बाईक प्रेमसुद्धा जगासमोर आलं आहे. विविध सिनेमा आणि मालिकांमध्ये दीप्तीनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'कंडिशन्स अप्लाय' हा तिचा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. आता या सिनेमानंतर दीप्तीनं नव्या सिनेमाची तयारी तर सुरु केली नाही ना असे प्रश्न या फोटोवरुन चर्चेत आले आहेत. 
Web Title: Have you seen the love of Deepika Bachi?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.