Harishali Zee will be seen in the film Ashishi Taishi | हर्षाली झिने झळकणार भविष्याची ऐशी तैशी या चित्रपटात

कॅरोल झिने ही अभिनेत्री आज प्रेक्षकांना हर्षाली झिने या नावाने माहीत आहे. तिने छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. आता पुन्हा एकदा ती एका मराठी चित्रपटात प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार आहे. हर्षालीने हिटलर दिदी, दिया और बाती हम, सीआयडी, आहट, भंवर, सावधान इंडिया, इश्क किल्स, हाँटेड नाईट्स आणि किस्मत कनेक्शन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. दिया और बाती हम, हिटलर दिदी या मालिकांमधील तिच्या भूमिकांची चांगलीच चर्चा झाली होती. रामात रावण, उचला रे उचला, पाच नार एक बेजार या मराठी चित्रपटांमधील तिच्या भूमिकांचे देखील कौतुक झाले होते. आता ती भविष्याची ऐशी तैशी या चित्रपटात दिसणार आहे.
भविष्य हा नेहमीच कुतूहलाचा विषय ठरला आहे, पण अनेकजण वर्तमानामध्ये आयुष्याचा आनंद घेणेच जास्त पसंत करतात. अशाच काहीच्या विषयावर बेतलेला एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येत असून या चित्रपटात हर्षाली मुख्य भूमिकेत झळकणार आहे. भविष्याची ऐशी तैशी असे या चित्रपटाचे नाव असून हा एक थ्रिलर सिनेमा असणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात निशी या एका कन्फ्युज्ड मुलीची भूमिका हर्षालीने साकारली आहे. या चित्रपटात काम करायला खूपच मजा आली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा तिचा अनुभव खूपच चांगला होता असे ती सांगते. 
या चित्रपटाचे नाव भविष्याची ऐशी तैशी असल्यामुळे हर्षालीला भविष्य विषयावर विचारले असता ती सांगते, ''भविष्य पाहणे ही गोष्ट मी जास्त सिरीयसली घेत नाही आणि इतरांनीही ती घेऊ नये असे मला वाटते. प्रत्येकाने आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करून काम करत राहावे असे मी सगळ्यांना सांगेन.
रमेश तलवार निर्मित आणि सुरेंद्र वर्मा दिग्दर्शित भविष्याची ऐशी तैशी या सिनेमात अनेक दिग्गज मराठी कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 
Web Title: Harishali Zee will be seen in the film Ashishi Taishi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.