Halle Boobatra Fame Rina Agarwal will be in the film Terei | झाला बोभाटा फेम ​रिना अग्रवाल बहेन होगी तेरी या चित्रपटात

झाला बोभाटा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात मयुरेश पेम आणि मोनालिसा बागल हे नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, संग्राम साळवी, कमलेश सावंत, दिपाली अंबिकार या कलाकारांचादेखील समावेश आहे. या चित्रपटात रिना अग्रवालदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
झाला बोभाटानंतर आता रिना एका हिंदी चित्रपटात काम करणार आहे. रिना या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. रिनाला आता बॉलिवूडची लॉटरीच लागली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण ती बहेन होगी तेरी या चित्रपटात श्रुती हसन आणि राजकुमार राव यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटात ती एक महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लखनऊ येथे सुरू आहे. बिग बॉस या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला गौतम गुलाटीदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. 
रिनाने याआधीदेखील तलाश या चित्रपटात काम केले होते. पण तलाश या चित्रपटात तिच्या वाट्याला आलेली भूमिका ही खूपच छोटी होती. 
रिनाने हिंदी मालिकांमध्येदेखील काम केले आहे. एजंट राघव या प्रसिद्ध मालिकेतही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. रिना सध्या हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीत काम करत असली तरी तिची सुरुवात ही मराठी इंडस्ट्रीमधूनच झाली आहे. तिने अंजिठा या मराठी चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच तिने अनेक मराठी नाटकांमध्येदेखील काम केले आहे. 
Web Title: Halle Boobatra Fame Rina Agarwal will be in the film Terei
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.