'Gulabjam' bold poster viral on social media | 'गुलाबजाम'चं बोल्ड पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

मराठी सिनेमांमध्ये नवीन विषय मोठ्या खुबीने हाताळले जात आहेत. रसिकांना मराठी सिनेमात होणारे प्रयोग भावतायत. आता हिंदी सिनेमांप्रमाणे काहीशी बोल्ड विषयसुद्धा मराठी सिनेमातून हाताळले जात आहे. सिनेमातून कायम चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारा दिग्दर्शक सचिन कुंडलकर यानं असाच प्रयोग त्याच्या आगामी मराठी सिनेमात केला आहे. या सिनेमाचं नाव आहे गुलाबजाम. या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर तुफान गाजतंय. कारण या सिनेमाचं पोस्टर भलतंच बोल्ड आहे. या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाच्या पोस्टरवर सिद्धार्थ आणि सोनाली यांचे वेगवेगळे फोटो एकत्र करण्यात आले आहेत. अशाप्रकारचे इतकं बोल्ड पोस्टर मराठी सिनेमात अपवादानंच पाहायला मिळतं. खुद्द सचिन कुंडलकरनं हे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. शिवाय या सिनेमाची कथा कशी असेल हेही त्याने सांगितले आहे.‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणा-या भारतीय माणसाची गोष्ट आहे. मराठी पारंपारिक खाद्यपदार्थ शिकण्यासाठी आदित्य म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर भारतात येतो आणि पुण्यात आदित्यची भेट राधा अर्थात सोनाली कुलकर्णीशी होते. राधा त्याला तिची कला आणि भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थची टेकनिक शिकवण्याचा निर्णय घेते. यानंतर राधा आणि आदित्यच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते. मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कशी वळणे येतात हे सर्व सांगणारी सुंदर कथा म्हणजे गुलाबजाम हा सिनेमा आहे असं कुंडलकर यांनी लिहिलंय. वजनदार या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता या बोल्ड पोस्टरमुळे गुलाबजाम सिनेमाबाबत रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Web Title: 'Gulabjam' bold poster viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.