A glamorous actress appeared in the present, and this actor gave a reaction! | Glamorous अंदाजात दिसली अभिनेत्री, तर या अभिनेत्याने दिली अशी रिअॅक्शन!

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेतील गॅरी म्हणजेच गुरूनाथ सुभेदार(अभिजित खांडकेकर) याचं ऑनस्क्रीन पत्नी राधिकासोबत पटत नसलं तरी रिअल लाइफमध्ये गुरुनाथचं त्याच्या रिअल लाईफ पत्नीवर विशेष प्रेम आहे.आणि अभिजित खांडकेकरची रिअल लाईफ पत्नी आहे अभिनेत्री सुखदा खांडकेकर. नुकतेच एका जाहिरातीसाठी सुखदा खांडकेकरचा Glamorous अंदाज पाहायला मिळाला.यावेळी व्हाईट कलरच्या गाऊन तिने परिधान केला होता.या गाऊनमध्ये तिचे सौदर्य कमालिचे खुलून आल्याचे पाहायला मिळत आहे.व्हाईट कलरच्या गाऊनमध्ये सुखदाचा अंदाज तितकाच घायाळ करणारा आहे.त्यामुळे सुखदाने हे फोटो शेअर करताच तिला तिच्या चाहत्यांकडून खुप सारे कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत.तर दुसरीकडे पती अभिजित खांडकेरने देखील  Love U अशी कमेंट देत तिचे खूप कौतुक केले आहे.त्यामुळे सुखदाने फक्त अभिजितलाच नाहीतर इतर चाहत्यांनाही आपल्या लूकने क्लिन बोल्ड केल्याचे पाहायला मिळत आहे.

Also Read:‘गॅरी’ आणि त्याच्या रिअल लाईफ ‘राधिका’ची फेसबुकवरुन सुरु झाली होती लव्हस्टोरी!

अभिजीत आणि सुखदा हे दोघंही अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'ध्यानीमनी', 'भय', 'ढोलताशे' या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात. दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे.'हीच तर प्रेमाची गंमत आहे' या नाटकात सुखदाने डॉ. अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती.'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.

अभिजीतचं अभिनेत्री सुखदा देशपांडे हिच्याशी दीड वर्षांपूर्वी लग्न झालं आहे.अभिजीत आणि सुखदा यांचं लग्न अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे.अभिजीत आणि सुखदा यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं.फेसबुकवरील या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.यानंतर एकमेकांचा विचार करायला हरकत नाही अशा शब्दांत अभिजीतनंच सुखदाला प्रपोज केलं.सुखदाने हे अभिजीतचे हे प्रपोज स्वीकारलं आणि 1 फेब्रुवारी 2013 रोजी दोघंही रेशीमगाठीत अडकले. 
Web Title: A glamorous actress appeared in the present, and this actor gave a reaction!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.