Girish Kulkarni has become permanently away from this thing | गिरीश कुलकर्णी या गोष्टीपासून कायमचा झाला दूर

वळू असो, विहीर असो, देऊळ किंवा बॉलिवूड सुपरहिट दंगल सिनेमा असो  प्रत्येक सिनेमात अभिनेता गिरीश कुलकर्णीने विविधारंगी भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. नेहमीच आव्हानात्मक भूमिका समर्थपणे निभावलेल्या गिरीश कुलकर्णीला  दिवाळीत फटाके वाजयला आवडत नाही. गिरीशने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, लहानपणी फटाके बाजवत असताना एक छोटा अपघात झाला होता तेव्हापासून फटाकेच वाजवणे बंद केले.फटाकेविरहीत दिवाळी साजरी करण्यावर भर दिल्याचे गिरिश कुलकर्णीने सांगितले.कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्याची मजा काही वेगळीच असते.त्यामुळे कामातून वेळ काढत दिवाळी कुटुंबासोबत सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करणार असून दिवाळी आतषबाजीचा सण असला तरीही फटाके कमी वाजवा असा संदेशही यावेळी गिरीश कुलकर्णीने त्याच्या चाहत्यांना दिला आहे.प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद आणि नवी ऊर्जा घेऊन येणारा हा सण आगळावेगळा आहे.  अशा या आनंदाच्या क्षणी दुसऱ्यांना त्रासदायक वाटतील असे फटाके उडवण्यापेक्षा.फराळावर ताव मारणे, शॉपिंग करणे,नातेवाईकांना गिफ्ट देणे अशाप्रकार दिवळी साजरी करत असल्याचे गिरीशने सांगितले. 
 फेणे या सिनेमात गिरीश कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे.बनेश्वरवरून पुण्यात मेडिकलची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका जिज्ञासू आणि उत्साही मुलाची म्हणजेच बनेश फेणेची कथा प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे.पक्षीमित्र, निसर्गप्रेमी, टेक्नॉलॉजिचा चाहता आणि सायकलपटू असलेला बनेश पुण्यात येतो तेव्हा तो, त्याची बालमैत्रीण आणि आता पत्रकार असलेल्या अबोलीला तसेच गुन्हेगारी सोडून सरळमार्गी जगायला लागलेल्या लहान मुलाला- भूभूला भेटतो. बनेश परीक्षेच्या तयारीला लागतो. परीक्षा केंद्रावर त्याची धनेश नावाच्या एका चुणचुणीत आणि हुशार मुलाशी ओळख होते आणि दुसऱ्याच दिवशी एक अनपेक्षित घटना घडते. ही घटना बनेशला मुळापासून हादरवून टाकते आणि सगळ्यांच्याच आयुष्यात एक विलक्षण गुंतागुंत निर्माण होते. शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आणि सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलीकडे असणारा निगरगट्ट वृत्तीचा अप्पा; सत्य शोधून काढल्याशिवाय चैन न पडणाऱ्या आणि संकटांना बेधडकपणे सामोरे जाणाऱ्या फेणेसमोर आव्हान म्हणून उभा ठाकतो. या जीवघेण्या शोधात फेणे यशस्वी होतो का याबद्दलचा उत्कंठावर्धक प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमात गिरीश कुलकर्णी अप्पांच्या भूमिकेत झळकणार आहे.
 
Web Title: Girish Kulkarni has become permanently away from this thing
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.