Gary's 'Second Shaniya' in 'My New Wives', shared on Rajasthan Safari, Social Media | 'माझ्या नव-याची बायको'मालिकेतील गॅरीची ‘दुसरी शनाया’ राजस्थान सफारीवर,सोशल मीडियावर शेअर केले फोटो

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील गुरुनाथ म्हणजेच गॅरी अर्थातच अभिनेता अभिजीत खांडकेकर. राधिका आणि शनायाच्या कात्रीत अडकलेला गॅरी अभिजीतने मोठ्या खुबीने रंगवला आहे.घरवाली आणि बाहरवाली यांना सांभाळता सांभाळता गॅरीची उडणारी धावपळ, गोंधळ रसिकांना चांगलीच भावते. तर राधिका आणि शनायाची जुगलबंदी तर रसिकांच्या मनात घर करुन गेली आहे. गुरु, राधिका आणि शनायासह मालिकेतील इतर व्यक्तीरेखासुद्धा तितक्याच खास आहेत. या रेवती, नाना, नानी, आनंद, श्रेयस, पानवलकर, जेनी, गुप्ते ही पात्रसुद्धा तितकेच लक्षवेधी आहेत. अशाच एका व्यक्तीरेखांपैकी एक मालिकेतील व्यक्तीरेखा रसिकांना भावली होती. ती व्यक्तीरेखा म्हणजे संजना. गुरुच्या ऑफिसमध्ये ट्रेनी म्हणून ती दाखल झाली होती. छोट्याशा भूमिकेतून संजना साकारणा-या मीरा जगन्नाथ या अभिनेत्रीने रसिकांच्या मनात घर केलं होतं. मात्र काही काळानंतर तिची मालिकेतून एक्झिट झाली.सध्या हिच संजना म्हणजे मीरा राजस्थानमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मीराने या सुट्ट्यांच्या काळातील काही फोटोही सोशल मीडिया साईटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आणि एका व्हिडिओमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री दीप्ती देवसुद्धा पाहायला मिळते आहे.काही महिन्यांपूर्वी मीरा आणि दीप्तीची वेगळीच चर्चा रंगली होती. मीराने अभिनेत्री दीप्ती देवीसोबत इंटिमेट फोटोशूट केले होते. या फोटोशूटने सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या होत्या. या फोटोशूटची बरीच उलटसुलट चर्चाही रंगली होती.मीरा जगन्नाथ मॉडेलिंग क्षेत्रात बरीच अॅक्टिव्ह आहे.तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोतून याची प्रचिती येते.

मीराने केलेले फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.मीरा जगन्नाथ मॉडेलिंग क्षेत्रात असल्यामुळे तिचे फोटो लक्षवेधून घेतात.रॉकिंग आणि स्टनिंग स्टाईलसह चेह-यावरील घायाळ करणारे स्माईल यामुळे मीराच्या या फोटोंचीही सोशल मीडियावर खुमासदार चर्चा रंगली आहे.सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे खूप कमी वेळेत तिने रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. 
Web Title: Gary's 'Second Shaniya' in 'My New Wives', shared on Rajasthan Safari, Social Media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.