Friendship between Baha'bish Talist and Ankita Lokhande Bahretey | वैभव तत्ववादी आणि अंकिता लोखंडे यांच्यातील मैत्री बहरतेय

मराठी इंडस्ट्रिमधला चॉकलेटबॉय वैभव तत्ववादी आणि छोट्या पडद्यावरची 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे यांची जोडी आगामी हिंदी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.कंगना राणौतची मुख्य भूमिका असलेला 'मणिकर्णिका' या चित्रपटात ही नवी जोडी एकत्र येणार असून या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान चांगलीच मैत्री झाली असल्याची चर्चा आहे.एवढंच नव्हे तर, दोघांच्या आवडीनिवडीमध्येही खूप साम्य दिसते.फूड,अध्यात्म आणि मेडिटेशन या तीनही विषयात आम्हा दोघांनाही फार गोडी असल्याचं वैभवनं सांगितलं.‘मणिकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट झाशीची राणीवर आधारित आहे.वैभव आणि अंकिता यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे.सध्या या चित्रपटाचं शूटींग राजस्थानच्या बिकानेरमध्ये सुरू आहे.एकत्र काम करताना त्यांच्यात चांगलीच मैत्री निर्माण झाली.वैभव म्हणतो,‘आम्ही दोघंही प्रचंड फुडी आहोत.आम्ही एकत्र असलो की आमचं डाएट कुठल्या कुठे पळतं.काही दिवसांपूर्वी आम्ही दालबत्ती, गाजराचा हलवा आणि आईस्क्रीमवर ताव मारला होता.अलसिसार इथं आम्ही खास हे पदार्थ खाण्यासाठी गेलो होतो.जयपूरपासून अलसिसार हे तीन तासावर आहे.केवळ दालबत्ती आणि आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही तीन तास प्रवास करून गेलो.’एवढंच नव्हे तर वैभवने एक नवी गोष्ट त्याच्या चाहत्यांसाठी सांगितली आहे.वैभव आणि अंकिता हे दोघेही प्रचंड अध्यात्मिक आहेत.तो म्हणतो यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही,मात्र आम्ही दोघं एकत्र असलो की आमच्यात अध्यात्मिकतेवर बरीच चर्चा होते.श्री श्री रविशंकर आणि सद्गुरुंची बरीच पुस्तकं वाचली आहेत.त्यामुळे आम्ही अध्यात्मिक विषयावर खूपवेळ गप्पा मारतो. तसेच दोघांचे सेटवरील एक फोटो वैभवने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता.या फोटोमध्ये वैभव रिलॅक्स मूडमध्ये दिसला.शूटिंगनंतर रिकाम्या वेळेत वैभव त्याचे सेटवरील फोटो आपल्या फॅन्ससह सोशल मीडियावर शेअर करत असतो.वैभव तत्त्ववादी याचा हा काही पहिलाच हिंदी सिनेमा नाही.याआधी त्याने संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातही काम केले होते.या सिनेमात वैभवने चिमाजी आप्पा ही भूमिका साकारली होती.मराठीत आपल्या अभिनयाने तरुणींसह रसिकांची मनं जिंकणारा वैभव चिमाजी आप्पाच्या भूमिकेमुळे भलताच भाव खाऊन गेला होता.आता 'मणिकर्णिका' या सिनेमातील वैभव पूरण सिंह या व्यक्तीरेखेलाही चिमाजी आप्पा या भूमिकेप्रमाणे न्याय देण्याचा आणि रसिकांची मने जिंकण्याचा वैभवचा मानस आहे. 
Web Title: Friendship between Baha'bish Talist and Ankita Lokhande Bahretey
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.