Before the first Marathi cinema was released, Swainandi Barde signed the second movie | पहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच स्वानंदी बेर्डेने साईन केला दुसरा सिनेमा

'लक्ष्या' म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेने आपल्या अभिनयाने रसिकांना पोट धरुन हसायला लावलं,त्यांचं मनोरंजन केलं.मात्र या जगातून लक्ष्याची अचानक एक्झिट झाली आणि सा-या रसिकांच्या डोळ्यात पाणी आलं.जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत लक्ष्याने रसिकांचं मनोरंजन केलं.लक्ष्यानंतर गेल्या वर्षी लक्ष्याचा लेक अभिनय बेर्डे यानेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.'ती सध्या काय करते' सिनेमाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं.या सिनेमातील अभिनयच्या भूमिकेचे आणि त्याच्या अभिनय कौशल्याचे सा-यांकडूनच कौतुक झालं होते.त्याच्याच पाऊलावर पाऊल ठेवत अभिनयची बहिण म्हणजेच स्वानंदी बेर्डेनेही चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत असल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली होती.'रिस्पेक्ट' हा सिनेमा किशोर बेळेकरने दिग्दर्शिक केला आहे.हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच आता स्वानंदीला आणखी एका मराठी सिनेमाची लॉटरी लागली आहे.योगेश जाधव दिग्दर्शित 'मन येड्यागत झाला' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची माहिती मिळते.या सिनेमात स्वानंदीसोबत सुमेध मुदगलकरही झळकणार आहे.सुमेध या आधी 'मांजा' आणि ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमात झळकला होता.तसेच तो माधुरी दीक्षितचा बहुप्रतिक्षित 'बकेटलिस्ट' सिनेमातही झळकणार आहे.त्यामुळे सुमेधही लागोपाठ  मराठी सिनेमांच्या मिळणा-या ऑफर्समुळे खूप खुश आहे.   


खूप कमी वेळेत सुमेधने इंडस्ट्रीत स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केले आहे.आपल्या चॉकलेटी लुक्सने सध्या लाखों तरूणींची धडकन बनलेला सुमेध मुदगलकरने त्याने आजवर केलेल्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलनंतर बकेटलिस्ट सुमेधसाठी ही त्याच्या करीयरची एक महत्वपूर्ण सिनेमा असेल.खुद्द माधुरीनेत सुमेधच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.माधुरी दीक्षित सुमेधविषयी म्हणते, “बकेटलिस्ट चित्रपटातला तुझा परफॉर्मन्स नक्कीच प्रेक्षकांना भावेल.आणि त्याने तू किती अभिनेता आहेस, हे रसिकांसमोर सिद्ध होईल ह्याचा मला विश्वास वाटतो.तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”असे म्हणत माधुरीने सुमेधचे कौतुक केले आहे.“माधुरी मॅमकडून अशी शाबासकी व्हावी, हे माझ्यासारख्या कोणत्याही नव्या अभिनेत्याचं भाग्यच म्हणावे लागेल. त्यांची जेवढी कारकिर्द आहे, तेवढं माझं वयही नाही आहे.पण त्यांनी सोशल मीडियावर येऊन अशी जाहिरपणे माझी स्तुती करावी, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचे सुमेधने म्हटले आहे .”
Web Title: Before the first Marathi cinema was released, Swainandi Barde signed the second movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.