First Look Launch of 'One Way Ticket' | ​‘वन वे टिकिट’चा फर्स्ट लूक लाँच

मराठी सिनेमा ग्लोबल होतोय. कथा आणि आशयाच्या बाबतीत तर मराठी चित्रपट उत्तम आहेच, परंतु आता तांत्रिक बाबतीतही तो प्रगल्भ होऊ पाहत आहे.

तिकिट खिडकीवरील कमाई वाढताना पाहून आता निर्मातेदेखील नवीन जोखीम उचलायला तयार होताना दिसत आहेत.

याचे ताजे उदाहरण म्हणजे आगामी चित्रपट ‘वन वे टिकिट’. सचित पाटील, अमृता खानविलकर आणि गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे तीन देशांत चित्रितकरण करण्यात आलेले आहे.

एका क्रुझ शिपवर या चित्रपटाचे कथानक घडते. युरोप प्रवासाला निघालेल्या या शिपवर प्रेम, रहस्य, अ‍ॅक्शन पाहायला मिळणार असे चित्रपटाच्या फर्स्ट लूकवरून वाटतेय. इटली, फ्रान्स आणि स्पेन अशा तीन देशांच्या नयनरम्य लोकेशन्स पाहून चित्रपटाची भव्यता दिसून येते.

दिग्दर्शक अमोल शेटगे म्हणतो, मराठी चित्रपट प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणात तयार करण्यात आलेला आहे. निर्मात्यांनी माझ्या व्हिजनमध्ये कुठेही तडजोड केली नाही. सर्व कलाकारांनी त्यांच्या बेस्ट अभिनय केला आहे. तरुण क्रु सदस्यांसोबत काम करताना खरचं खूप मजा आली.

One Wya ticket

चित्रपटात ‘श्री’ म्हणजेच शशांक केतकर आणि नेहा महाजन हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Web Title: First Look Launch of 'One Way Ticket'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.